आर्थिक

लाडकी बहिणीच्या खात्यावर आले पैसे; परंतु फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे काय? अहमदनगर जिल्ह्यातील 5 हजार अंगणवाडी सेविका लाभापासून वंचित

राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली व लागलीच त्याच्या संबंधीचे प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. यासाठीचे जे काही महिलांचे फॉर्म होते ते भरण्याचे काम हे अंगणवाडी सेविकांकडे प्रामुख्याने देण्यात आले होते व अंगणवाडी सेविकांना प्रति फार्म पन्नास रुपयांचे प्रोत्साहन अनुदान सरकार देणार होते.

परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे आले व अजून येणे सुरूच आहे. परंतु रात्रंदिवस कष्ट करून या योजनेचे फॉर्म भरणारे अंगणवाडी सेविकांना मात्र अजून एक रुपया देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही. एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका यापासून वंचित आहेत.

 अंगणवाडी सेविकांना एक रुपयाही नाही

मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजनेत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. सप्टेंबर महिन्याचा हप्तादेखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. परंतु दिवसरात्र एक करून लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अजून एक पैसाही मिळालेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक अंगणवाडीताई प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. तेव्हा लाभार्थ्यांचे – अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, – सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी – पर्यवेक्षिका यासह ११ जणांना प्राधिकृत = केले होते. परंतु ६ सप्टेंबरला एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचेअर्ज अंगणवाडीत भरते फक्त अंगणवाडी सेविकांनाच लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे.

मात्र त्यांना प्रत्यक्षात एकही रुपया मिळालेला नाही.अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे. सरकार आणखी किती दिवस विनामोबदला अंगणवाडीताईंना राबवून घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्ह्यात ५ हजार ३७५ अंगणवाडी आहेत. यातील रिक्त जागा वगळता पाच हजार अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीअंगणवाडी सेविकांच्या खात्यावर येणार पैसे सध्या लाडकी बहीण योजनेतील महिलांचे अर्ज अंगणवाडीत घेण्याचे काम सुरू आहे.

अंगणवाडी सेविकांची माहिती योजनेच्या संकेतस्थळाशी लिक असल्याने भरलेल्या अर्जाची माहिती अर्जासोबत अपलोड होते, सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यावर प्रोत्साहन भत्ता जमा होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

महिलांचे अर्ज भरून घेण्यात मोठी भूमिका बजावली होती. प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकेला ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार येईल, असे सरकारने जाहीर केले होते. तसेच महिलांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली होती.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts