आर्थिक

State Bank of India : भारीचं की ! ‘या’ कामांसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही, SBIने सुरु केली नवीन सुविधा !

State Bank of India : SBI बँकेच्या ग्रहकांसाठी कामाची बातमी आहे. बँकेच्या ग्राहकांना आता या कामांसाठी बँकेला चकरा मारण्याची गरज नाही. हे काम आता ग्राहक घरबसल्या देखील करू शकणार आहेत. SBI आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. अशातच आता बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

बँकेने आता आपल्या ग्राहक सेवा केंद्र (CSP) एजंटना हलकी उपकरणे दिली आहेत जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज उचलता येतील. या उपकरणांच्या मदतीने एजंट कोणत्याही ग्राहकाला त्याच्या घरी पैसे काढणे, डिपॉझिट आणि मिनी स्टेटमेंट यांसारख्या सुविधा देऊ शकतील. बँकेचे हे पाऊल ‘किओस्क बँकिंग’ थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवते.

यावर बोलताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, ‘या उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेश मजबूत करणे आणि सामान्य लोकांना आवश्यक बँकिंग सेवा प्रदान करणे हा आहे. हा उपक्रम बँक सेवांचा लाभ घेण्यासाठी सुलभता आणि सुविधा वाढवण्याचा एक भाग आहे. खारा म्हणाले की, बँकेच्या या नवीन उपक्रमामुळे ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) एजंटना ग्राहकांच्या दारात बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोय होईल. याशिवाय आजारी, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींनाही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.

SBI चेअरमन म्हणाले की, नवीन उपक्रमांतर्गत सुरुवातीला पाच प्रमुख बँकिंग सेवा पुरवल्या जातील, त्या म्हणजे, पैसे काढणे, ठेव, मनी ट्रान्सफर, बॅलन्स चेक करणे आणि मिनी स्टेटमेंट देणे. बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवरील एकूण व्यवहारांपैकी 75 टक्क्यांहून अधिक या सेवांचा वाटा आहे. ते म्हणाले की, बँक नंतर सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे आणि कार्ड-आधारित सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

देशातील सर्वात मोठी बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही ग्राहक आणि मार्केट शेअरच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने CSP द्वारे ग्राहकांच्या दारापर्यंत पाच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्याने लाखो लोकांना फायदा होईल. बँकिंग नेटवर्कच्या बाबतीत SBI अव्वल स्थानावर आहे, कारण देशभरात तिच्या 24,000 पेक्षा जास्त शाखा आणि 62,000 पेक्षा जास्त ATM आहेत. SBI चे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत आणि सुमारे 2.5 लाख कर्मचारी त्यात काम करतात.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts