Fixed Deposit : सध्या अशा काही बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. तुम्ही येथे गुंतवणूक करून 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. हा व्याजदर कोणत्या बँका ऑफर करत आहेत पाहूया…
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3.50 ते 8.70 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देत आहे. 12 महिने ते 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज बँकेत उपलब्ध आहे. बँकेत 5 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. बँकेने 2 मार्च रोजी एफडीवरील व्याजदरात बदल केला होता.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य गुंतवणूकदारांना 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याज देत आहे. 15 महिन्यांच्या FD वर बँकेकडून जास्तीत जास्त 8.5 टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर (FD) 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे. याशिवाय एका वर्षाच्या एफडीवर 8.25 टक्के, 990 दिवसांच्या एफडीवर 7.75 क्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज दिले जात आहे. बँकेने मार्च 2015 मध्ये व्याजदरात बदल केले होते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक गुंतवणूकदारांना ४ टक्के ते 9.01 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना 4.40 टक्के ते 9.25 टक्के व्याज मिळत आहे. बँकेत सर्वाधिक व्याज 9.25 टक्के एफडीवर दिले जात आहे. बँकेत 5 वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. बँकेने 1 मार्च रोजी व्याजदरात बदल केला होता.