आर्थिक

‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांना अल्प कालावधीत देणार बंपर परतावा ! तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Top 5 Share To Buy : स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये बंपर परतावा दिला आहे. अनेक गुंतवणूकदारांचे यामुळे नशीब फळफळले आहे. पण काही स्टॉक असेही असतात जे अल्पकालावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. दरम्यान, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष राहणार आहे.

खरेतर शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना काही अशा शेअर्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे जें आगामी काही काळात चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे. शेअर बाजार तज्ज्ञ जतिन गेडिया आणि नुरेश मेरानी यांनी हा महत्त्वाचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. तज्ञांनी अशा शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे जे अल्पकालावधीतच चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कोटक महिंद्रा : ही एक देशातील नामांकित खाजगी बँक आहे. शेअर बाजार तज्ज्ञ जतिन गेडिया यांनी या बँकेच्या शेअर्समध्ये विश्वास दाखवला आहे. त्यांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजे शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा स्टॉक 1900 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सध्या हा स्टॉक बाजारात 1822 रुपयांवर ट्रेड करत आहे. दरम्यान या स्टॉकसाठी ब्रोकरेजने 1790 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्यास सांगितलं आहे.

सन फार्मा : अस म्हणतात की बँका आणि मेडिकलचे शेअर्स कधीच नुकसान करत नाही. दरम्यान, याच विचारसरणीवर विश्वास दाखवत शेअर बाजार तज्ज्ञ जतिन गेडिया यांनी सन फार्मा या कंपनीच्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. म्हणजे या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. त्यांनी हा स्टॉक 1280 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज बांधला आहे.

सध्या हा स्टॉक 1236 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजे याच्या किमती जवळपास 45 रुपयांपर्यंत वाढतील असा अंदाज आहे. पण ब्रोकरेजने या शेअर्ससाठी 1220 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे. म्हणजे याच्या खाली किमती केल्या तर गुंतवणूकदारांनी शेअर विक्री केली पाहिजे असा याचा अर्थ होतो.

मारुती सुझुकी : ही देशातील एक नामांकित ऑटोमोबाईल कंपनी आहे. या ऑटोमोबाईल कंपन्यांवर अनेकांचा विश्वास आहे. या कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले एक वेगळे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अशातच आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना देखील चांगला परतावा देणार असा अंदाज आहे. शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी यांनी मारुती सुझुकीच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिली आहे. या कंपनीचे स्टॉक लवकरच 11 हजार 300 चा टप्पा गाठणार असा अंदाज आहे. सध्या बाजारात हा स्टॉक 10 हजार 627 रुपयांवर ट्रेड करत आहे.

इंडसइंड बँक : शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी यांनी या बँकिंग शेअरवर विश्वास दाखवला आहे. या शेअर्सला मेरानी यांनी बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉक ची किंमत लवकरच 1650 चा टप्पा गाठवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या हा स्टॉक बाजारात १४९५ रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजे आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असा अंदाज आहे.

स्पार्क : शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी यांनी स्पार्कच्या शेअर्सवर देखील विश्वास दाखवला आहे. त्यांनी या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा स्टॉक 278 रुपयांवर ट्रेड करत असून लवकरच याच्या किमती 330 रुपयांचा टप्पा गाठतील असा अंदाज आहे. यासाठी मात्र गुंतवणूकदारांनी 265 रुपयाचा स्टॉप लॉस लावला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Share

Recent Posts