FD Interest Rates : जर तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर FD तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण FD मधील गुंतवणूक ही सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. दरम्यान, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज देत आहेत. आज आपण कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देत आहेत ते जाणून घेणार आहोत, चला तर मग…
Equitas Small Finance Bank
तुमच्या माहितीसाठी ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 444 दिवसांच्या FD वर 9% व्याजदर ऑफर करते. बँकेचे हे व्याजदर 21 ऑगस्ट 2023 म्हणजे आजपासून लागू आहेत. तुम्ही बँकेने देऊ केलेल्या आकर्षक व्याजदरांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही सध्या उत्तम परतवा देणारी स्कीम शोधत असाल तर येथे गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
ESAF Small Finance Bank
दुसऱ्या नंबर येते ती म्हणजे ESAF स्मॉल फायनान्स बँक, ही बँक 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 9% व्याज ऑफर करत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हे दर 14 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. तुम्ही येथे गुंतवणुकीचा विचार करू शकता.
Fincare Small Finance Bank FD
ही बँक 500, 750 आणि 1000 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर अनुक्रमे 9, 9.43, 9.21 टक्के दराने व्याजदर ऑफर करत आहे. 36 महिने 1 दिवस ते 42 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.15% व्याज आहे. हे दर २६ जुलै २०२३ पासून लागू आहेत. तुम्ही येथे गुंतवणूक करून जास्त परताव्याचा लाभ घेऊ शकता.
Jana Small Finance Bank
जन स्मॉल फायनान्स बँक 1095 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 9% आकर्षक व्याज देत आहे. हे बँक दर 15 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा पर्याय देखील तुमच्यासाठी उत्तम असेल.
North East Small Finance Bank
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 555 आणि 1111 दिवसांत परिपक्व होणार्या FD वर हमीभावाने 9.25% व्याज दर देत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हे दर 6 जून 2023 पासून लागू आहेत. दोन्ही व्याजदर बँकेच्या विशेष योजनेंतर्गत दिले जात आहेत. येथे मिळणारे व्याज हे इतर बँकांपेक्षा जास्त आहेत, येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
Suryoday Small Finance Bank
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 2 आणि 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर 9% आणि त्याहून अधिक सूट देत आहे. हे व्याजदर 7 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत. 15 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 9% व्याज आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षे ते 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 9.10 टक्के व्याज आहे.
Unity Small Finance Bank
युनिटी स्मॉल फायनान्स बँक विशेष कालावधीच्या FD वर 9.25 आणि 9.50% व्याजदर देत आहे. हे दर 11 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत. 6 महिने ते 201 दिवसांच्या FD वर 9.25% व्याज, 501 दिवसांच्या FD वर 9.25% आणि 1001 दिवसांच्या FD वर 9.50% व्याज उपलब्ध आहे.