आर्थिक

FD Interest Rates : ‘या’ बँका एका वर्षाच्या एफडीवर देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, बघा लिस्ट!

FD Interest Rates : भारतातील गुंतवणूकदार मुदत ठेवींना प्राधान्य देतात कारण ते गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित साधन मानले जाते. गुंतवणूकदार मुदत ठेवींमध्ये त्यांच्या सोयीनुसार 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. यात अल्प कालावधीसाठी 7 दिवसांपासून 12 महिन्यांपर्यंत आणि दीर्घ कालावधीसाठी 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. आजच्या या लेखात आपण कोणती बँक किती व्याज देत आहे जाणून घेणार आहोत चला तर मग…

खाजगी बँक

HDFC बँक

एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6 टक्के पर्यंत व्याज दर देत आहे.

ICICI बँक

ICICI बँक 7 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6 टक्के पर्यंत व्याज दर देखील देत आहे.

येस बँक

येस बँक 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3.25 टक्के ते 7.25 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक

SBI बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 5.75 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

PNB बँक

पंजाब नॅशनल बँक (PNB) 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 7 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

कॅनरा बँक

कॅनरा बँक 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 4 टक्के ते 6.85 टक्केपर्यंत व्याजदर देत आहे.

स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 4.50 टक्के ते 7.85 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक

जन स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी 3 टक्के ते 8.50 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 1 वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts