Senior citizens FD : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जाईल. या बँका सध्या आपल्या एफडीवर बक्कळ व्याजदर ऑफर करत आहेत.
या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.1 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. या यादीमध्ये अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका आहेत ज्या तीन वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर जास्त व्याजदर देतात. हे एफडी दर साधारणपणे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडींना लागू होतात.
DCB बँक
DCB बँक 26 महिने ते 37 महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील ज्येष्ठ नागरिक FD वर 8.1 टक्के व्याजदर देते.
RBL बँक
RBL बँक 24 दिवस ते 36 महिन्यांदरम्यान परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक FD वर 8 टक्के व्याज दर देते.
येस बँक
येस बँक 36 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 8 टक्के व्याज दर देखील देते.
बंधन बँक
बंधन बँक तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक एफडीवर 7.75 टक्के व्याजदर देते.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा दोन वर्षांच्या आणि तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर ऑफर करते.
IDFC बँक
आयडीएफसी बँक दोन वर्षे आणि एक दिवस ते तीन वर्षांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज दर देते.
इंडसइंड बँक
IndusInd बँक दोन वर्षे 9 महिने ते तीन वर्षे तीन महिन्यांदरम्यान परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक FD वर 7.75 टक्के व्याज दर देते.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व झालेल्या ज्येष्ठ नागरिक FD वर 7.6 टक्के व्याजदर ऑफर करते.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक तीन वर्षांत परिपक्व होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 7.6 टक्के व्याजदर देते.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंत परिपक्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज दर देते.