बरेचव्यक्ती एक घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी वाहनकर्ज आणि गृहकर्ज घेतात. साहजिकच या घेतलेल्या कर्जाचे दर महिन्याला आपल्याला ईएमआय भरणे गरजेचे असते. कर्ज घेताना आपल्याला बँकांच्या माध्यमातून ज्या काही अटी असतात त्या पाळूनच या पद्धतीचे बँकेचे हप्ते भरणे गरजेचे असते.
परंतु कधी कधी बँकांच्या निर्णयामुळे या हप्त्यांमध्ये वाढ होऊ शकते किंवा त्यात घट देखील होऊ शकते. म्हणजेच बँकांच्या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे परिणाम आपण घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांवर होत असतो. अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून होमलोन अर्थात गृह किंवा वाहन कर्ज घेतले असेल तर मात्र ही बातमी तुमच्यासाठी झटका देणारी ठरणार आहे. कारण आता पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या ग्राहकांची कर्ज आता महाग झालेली आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने एमसीएलआरमध्ये केली वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून एमसीएलआर वाढवण्यात आला असून त्यामुळे आता या बँकेच्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून एक ऑगस्ट 2024 रोजी निधी आधारित कर्ज दर म्हणजेच एमसीएलआर रेटमध्ये 0.05% ची वाढ जाहीर करण्यात आलेली आहे व त्यामुळे आता या बँकेचे बहुतेक ग्राहकांची कर्जे महाग झाली आहेत.
पर्सनल लोन आणि वाहन कर्जाच्या किमतीसाठी एक वर्षाच्या कालावधीचा एमसीएलआरचा वापर केला जातो व त्यामध्ये आता बँकेने वाढ करत तो दर 8.85 टक्क्यांवरून 8.90% केला आहे. एवढेच नाही तर तीन वर्षाचा एमसीएलआर देखील 0.5 टक्क्यांनी वाढवून तो आता 9.20% झाला आहे. याशिवाय एक महिना, तीन आणि सहा महिन्यांचे एमसीएलआर दर देखील 8.35 ते 8.55% दरम्यान असणार आहेत. ओव्हरनाईट एमसीएलआर देखील 8.25 टक्क्यांवरून तब्बल 8.30% करण्यात आला आहे व हे सर्व दर एक ऑगस्ट 2024 पासून लागू आहेत.
बँक ऑफ बडोदाने देखील एमसीएलआरमध्ये केली वाढ
पंजाब नॅशनल बँकेसोबतच बँक ऑफ बडोदाने देखील एक वर्षाच्या एमसीएलआर मध्ये 0.05% वाढ करण्याची बुधवारी घोषणा केली. हा दर आता 8.95 टक्के झाला आहे. परंतु बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून इतर कलावधीकरिता असलेल्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काय आहे एमसीएलआरचे महत्व?
भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा बँकिंग व्यवस्थेमध्ये घेतलेल्या कर्जांचे दर ठरवण्यासाठी एमसीएलआर महत्वाची भूमिका पार पाडते व हा एमसीएलआर दर बँकेचा निधीचा खर्च तसेच परिचलन खर्च आणि बँकेचा नफा मार्जिन लक्षात घेऊन ठरवला जात असतो.