Shakti Pumps(India)Limited Shares Price:- 8 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली व निफ्टीची देखील तीच परिस्थिती होती. परंतु या एवढ्या मोठ्या घसरणी मध्ये देखील शक्ती पंप इंडिया लिमिटेडच्या शेअर्सने मात्र चांगली वाढ नोंद केली.
या कंपनीच्या शेअर्समध्ये 59 रुपयांची वाढ झाली व या वाढीसह तो तेराशे चाळीस रुपयांवर पोहोचला. शेअर मार्केटच्या घसरणीमध्ये देखील या शेअरच्या वाढीमागील जर प्रमुख कारण बघितले तर या कंपनीच्या संचालक मंडळांने केलेली घोषणा महत्त्वाची ठरली.
शक्ती पंपच्या संचालक मंडळांने शेअर्सच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट च्या माध्यमातून 400 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली असून हा निधी कंपनी आता विस्तार योजनांना वापरणार आहे व या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली.
शक्ती पंप इंडिया लिमिटेडच्या शेअर्सने एका वर्षातील 621 टक्क्यांचा परतावा
जर आपण मागील एका वर्षाचा विचार केला तर शक्ती पंप इंडिया लिमिटेडचे शेअर्सने 621% नफा दिला असून या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स 8 जानेवारी 2024 रोजी 176.63 रुपयावर होते
व बरोबर एक वर्ष म्हणजेच 8 जानेवारी 2025 रोजी या शेअरची किंमत तब्बल १३४० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच गेल्या दोन वर्षाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या शक्ती पंपच्या शेअर्समध्ये 1816 टक्क्यांची वाढ झालेली आहे.
गेल्या एका महिन्यात शक्ती पंप लिमिटेडचे शेअर 63% वाढले आहेत. नऊ डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 781.30 रुपयांवर होता. गेल्या पाच दिवसांमध्ये या शेअर्समध्ये 15% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. शक्ती पंप इंडिया लिमिटेडचे मार्केट कॅप 15 हजार 300 कोटींच्या पुढे गेले आहे.
शक्ती पंपने वितरित केले पाच बोनस शेअर्स
इतकेच नाहीतर या कंपनीने त्यांच्या भागधारकांना एक शेअर्स मागे पाच बोनस शेअर्स वितरित केले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना 1:1 म्हणजेच एका शेअर मागे एक बोनस शेअर दिला होता.