आर्थिक

Multibagger Stocks: पैशांची बरसात करतील ‘हे’ शेअर्स! 1 महिन्यात मिळतोय 188 टक्क्यांचा परतावा

शेअर मार्केट मधून जर चांगला पैसा मिळवायचा असेल तर शेअर मार्केटवर पूर्णपणे लक्ष देणे गरजेचे आहे व याबाबतीत मार्केटचा ट्रेंड तसेच कुठल्या शेअर्स मागील एक महिन्यापासून कसा परफॉर्म करत आहे याबाबतीचा स्वतःचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतो. कारण जरी एखाद्या वेळेस शेअर बाजारात घसरण झाली तरी काही शेअर्स गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात व अशी स्थिती बऱ्याचदा मार्केटमध्ये आपल्याला दिसून येते.

त्यामुळे स्वतःचे मार्केट रिसर्च असणे खूप गरजेचे आहे.याच पद्धतीने जर आपण बघितले तर मार्केट घसरल्यानंतर देखील असे काही शेअर्स पाहायला मिळाले ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला व यामध्ये काही शेअर्सने मागील एका महिन्यामध्ये तब्बल 188 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला व विशेष म्हणजे यातील बरेच शेअर्स हे कमी किमतीचे आहेत.

पैशांचा पाऊस पाडणारे आहेत हे शेअर्स

1- बीजीआर एनर्जी सिस्टीम- बिजीआर एनर्जी सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या शेअरने एका महिन्यामध्ये गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला असून गेल्या महिन्याभरापूर्वी या शेअरची स्थिती बघितली तर त्याची किंमत 43.41 होती

व सध्या हा शेअर्स १०६.०९ रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच यावरून आपल्याला दिसून येते की एका महिन्यात या शेअरने 173.93% चा परतावा दिला आहे.

2- क्यूपिड ब्रेवरीज-क्यूपिड ब्रेवरीज अँड डिस्टलरीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांचा पैसा एका महिन्याच्या कालावधीत दुप्पट केला असून साधारणपणे महिनाभरापूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 28.29 रुपये होती

व सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत ७४.२० रुपये आहे. यावरून आपल्याला दिसून येते की एका महिन्यात या शेअर्सने 183.40% चा परतावा दिला आहे.

3- प्रीमियम एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर- या कंपनीच्या शेअर्सने देखील एका महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला असून गेल्या महिनाभरापूर्वी या कंपनीच्या एका शेअरची प्राईज 8.78 रुपये होती

व सध्या बीएसईवर प्रीमियर एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर्सची प्राईज 23.48 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एका महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 188.47% चा परतावा दिला आहे.

4- शुक्रा फार्मासूटिकल्स- या कंपनीच्या शेअर्सनेदेखील एका महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला असून एका महिनाभरापूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 62.50 होती

व आता या शेअरची किंमत 165.65 रुपये आहे. यावरून आपल्याला दिसून येते की एका महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 152.64 टक्क्यांचा परतावा दिला आहे

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts