FD Interest Rate : अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अधिक संख्या पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची आहे.
बँकेत एफडी करण्याला देखील विशेष महत्त्व दिले जात आहे. विशेषता अलीकडे देशातील प्रमुख बँकांच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याजदर दिले जात असल्याने एफडी करण्याला विशेष पसंती मिळत आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये मध्यंतरी चांगली वाढ केली होती यामुळे एफ डी चे व्याजदर देखील चांगलेच वाढले आहेत.
देशातील अनेक प्रमुख बँका एफडीवर चांगले व्याजदर देत आहेत. दरम्यान आज आपण देशातील एफडी साठी सर्वात जास्त व्याज देणाऱ्या तीन प्रमुख बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जे लोक एफडी करू इच्छित असतील त्यांच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरू शकते.
एफडी वर सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँका कोणत्या
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही भारतातील एक लोकप्रिय फायनान्शिअल वित्तीय संस्था आहे. ही अशी बँक आहे जी एफडीसाठी आकर्षक व्याजदर देते. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील FD वर जास्त व्याजदर देणार्या बँकांपैकी एक आहे.
ही बँक FD वर वार्षिक 9% दराने व्याजदर देत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. ही बँक FD साठी सामान्य लोकांसाठी वार्षिक 4.50% ते 9.00% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50% प्रतिवर्ष ते 9.50% प्रतिवर्ष पर्यंत व्याज देत आहे. या बँकेत 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD करता येते.
सूर्योदय बँक : ही बँक सुद्धा एफ डी वर चांगले व्याज देत आहे. ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना वार्षिक 4.00-8.65% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.50-9.10% दराने व्याज देत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या बँकेत एफडी खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली किमान रक्कम रु 1,000 आहे. या बँकेतील एफडीवरील व्याज दर 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींसाठी तिमाही आधारावर मोजला जात आहे.
Fincare Small Finance Bank : या बँकेच्या माध्यमातून देखील गुंतवणूकदारांना एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. जर तुम्ही सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर Fincare Small Finance Bank FD चा ऑप्शन तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो.
ही बँक आकर्षक व्याजदरांसह मुदत ठेव योजना ऑफर करत आहे. बँकेच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी वार्षिक 3.00% ते 8.61% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.60% ते 9.21% पर्यंत वार्षिक व्याजदर ऑफर केले जात आहे. या बँकेत सात दिवसांपासून ते 84 महिन्यांपर्यंत एफडी केली जाऊ शकते.