Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा यांनी विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. बँक ऑफ बडोदा आता गुंतवणूकदारांसाठी दोन विशेष ठेव योजना ऑफर करते. बँक 333 दिवसांच्या कालावधीसह ही योजना ऑफर करते. जी दरवर्षी 7.15 टक्के व्याज देते. दुसरी योजना ३९९ दिवसांची आहे, जी ठेवीदारांना 7.25 टक्के व्याज देते. नवीनतम FD व्याजदर 15 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या 4 विशेष योजना
त्याचप्रमाणे, बँक ऑफ महाराष्ट्र वेगवेगळ्या कालावधीसाठी चार विशेष योजना ऑफर करते, यामध्ये 200 दिवस, 400 दिवस, 666 दिवस आणि 777 दिवसांची योजना आहे. या योजनेचा व्याजदर कार्यकाळानुसार वाढतो, 200 दिवसांच्या ठेवीसाठी 6.9 टक्के, 400 दिवसांच्या ठेवीसाठी 7.10 टक्के, 666 दिवसांच्या ठेवीसाठी 7.15 टक्के आणि 777 दिवसांच्या ठेवीवर व्याजदर 7.25 टक्के आहे. हे व्याजदर 8 जुलै 2024 पासून लागू आहेत.
महत्वाची बाब म्हणजे, बँक ऑफ महाराष्ट्र केवळ विशेष मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देते. उर्वरित ठेवींवर व्याजदर वर्षाला ७ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
दरम्यान, ICICI बँकेने 2 जुलै 2024 पासून मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर आता 3 ते 7.20 टक्के दरम्यान आहेत. तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5 ते 7.75 टक्के व्याजदर आहेत. ॲक्सिस बँकेनेही १ जुलैपासून मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. ॲक्सिस बँकेचे व्याजदर आता ३ ते ७.२ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५ ते ७.७५ टक्के आहेत.