आर्थिक

गुड न्युज ! देशातील ‘या’ दोन बड्या बँकांनी वाढवले FD वरील व्याजदर, केव्हापासून लागू होणार नवीन दर?

FD Interest Rate : आपल्या देशात अनेक लोक एफडी मध्ये गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा बँकांमधील एफडी सुरक्षित असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान देशातील दोन बड्या बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील दोन खाजगी क्षेत्रातील नामांकित बँकांनी एफडीच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन बँकानी आपल्या ग्राहकांसाठी एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही बँकांनी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतला आहे. विशेष म्हणजे याची अंमलबजावणी देखील आता सुरू झाली आहे.

या दोन्ही बँकांनी सांगितल्याप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी 5 डिसेंबर 2023 पासून होणार आहे म्हणजेच पाच डिसेंबर पासून एफडी वरील नवीन व्याजदर लागू होणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या दोन्ही बँकांचे एफडी वरील सुधारित व्याजदर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँक एफडीसाठी कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर देते. मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक सामान्य माणसांना तीन टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंतचे व्याजदर देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना एफटी केल्यास 3.50% पासून ते 7.50% पर्यंतचे व्याजदर देते. म्हणजेच कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर व्याजदर कमी राहते आणि जास्तीच्या कालावधीसाठी एफडी केली तर व्याजदर साहजिकच जास्त राहते.

HDFC Bank : एचडीएफसी बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील एक नामांकित बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडी साठी वेगवेगळे व्याजदर देते. ही बँक आपल्या ग्राहकांना FD साठी 4.75 टक्क्यांपासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर ऑफर करत आहे. गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर कमी जास्त होतो. एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर ग्राहकांना मिळते. मात्र या बँकेकडून सामान्य माणसांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर हे जवळपास सारखेच आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts