Bank of Maharashtra : गृहकर्ज घेणाऱ्या करोडो ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. सार्वजनिक बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. बँकेने व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्के केला आहे. अशातच जर तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी खूप चांगली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र सध्या गृहकर्ज कमी व्याजदरावर ऑफर करत आहेत. तसेच गृहकर्जावर अनेक ऑफर्स देखील देत आहे. बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात करून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने नुकतेच आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्के केला आहे. बँकेने ग्राहकांना नवीन वर्षाची ऑफर म्हणून व्याजदरात ही कपात केली आहे.
एवढेच नाही तर बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जासाठीचे प्रक्रिया शुल्कही कमी केल्याचे सांगितले आहे. बँकेने म्हटले आहे की, कमी व्याजदराचा दुहेरी फायदा आणि गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करणे हे बँकेच्या सर्व ग्राहकांना चांगले वित्तपुरवठा उपाय प्रदान करण्याच्या आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करण्याच्या बँकेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
सध्याच्या उच्च व्याजदराच्या वातावरणात बँक ग्राहकांना खूश करण्यासाठी किरकोळ कर्ज स्वस्त करत असल्याचे देखील बँकेने म्हटले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, या ऑफरद्वारे बँक गृहकर्जावर बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक ऑफर करत आहे. बँकेने आपल्या ‘न्यू इयर धमाका ऑफर’ अंतर्गत घर, कार आणि किरकोळ सोने कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आधीच माफ केले आहेत.