आर्थिक

Share Market Knowledge : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ? जाणून घ्या स्टॉक आणि शेअर मधील फरक

Share Market Knowledge :- आजकाल बरेच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. अनेक तरुण देखील आता शेअर मार्केट मधील विविध कन्सेप्ट समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे.

शेअर मार्केट किंवा शेअर बाजार ही मर्यादित बाब नसून यामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना असतात. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग तसेच स्टॉप लॉस, दीर्घकालीन गुंतवणूक, पेनि स्टॉक, आयपीओ, टेक्निकल अनालिसिस यासारख्या बऱ्याच संकल्पना शेअर मार्केटमध्ये असतात.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास असणे खूप गरजेचे असते. यामध्ये प्रत्येक संकल्पनांच्या बाबतीत अनेक बारकावे असून अनेक टेक्निकल गोष्टी देखील यामध्ये असतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये या सगळ्या संकल्पना समजून उमजून घेऊनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

अनुषंगाने आपण शेअर मार्केटमधील जर एक शब्द पाहिला तर तो स्टॉक हा आपल्या कानी नेहमी पडत असतो. परंतु बऱ्याचदा आपण शेअर आणि स्टॉक या दोन्ही शब्दांचा अर्थ समान असल्याचे समजतो.

परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिले तर स्टॉक आणि शेअर यामध्ये फरक आहे. नेमका तो कोणता फरक आहे याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

शेअर म्हणजे काय?

एखादी कंपनीचा शेअर म्हणजे काय हे अगोदर समजून घेणे खूप गरजेचे आहे. कोणतीही कंपनी स्टॉकचे लहान लहान भागामध्ये किंवा लहान लहान रूपात विभागणी करते किंवा हिस्सा करते. याच स्टॉकचे हे वाटे,

हीस्से किंवा तुकडे यांना आपण कंपनीचे शेअर असे म्हणतो. यामध्ये कंपनीचा जो काही प्रत्येक शेअर किंवा भाग असतो तो त्या कंपनीचा त्या वाट्या पुरती गुंतवणूकदाराचे मालकी दर्शवतो. उदाहरणच घ्यायचे झाले

तर समजा एखाद्या कंपनीचे एक लाख शेअर आहेत व गुंतवणूकदाराने त्यातील 100 शेअरची खरेदी केली. तर त्या कंपनीमध्ये संबंधित गुंतवणूकदाराचा 0.1% इतका वाटा आहे असे समजले जाते.

स्टॉक म्हणजे नेमके काय?

एखाद्या कंपनीचा स्टॉक म्हणजेच त्या कंपनीची संपूर्ण मालकी या माध्यमातून दर्शवली जाते. जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारातून पैसा गोळा करायचा असतो तेव्हा कंपनीचे स्टॉक अगोदर शेअर बाजारात विकते व याच स्टॉकचे लहान लहान तुकडे किंवा हिस्से करण्यात येतात व त्यालाच आपण शेअर असे म्हणतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts