आर्थिक

Personal Loan : ‘ही’ बँक कमी व्याजासह देत आहे 20 लाखांपर्यंत कर्ज, प्रक्रिया शुल्कही माफ !

Personal Loan : आयुष्यात प्रत्येक व्यक्तीनां कधी न कधी अचानक पैशांची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मागतात. तर काही लोक पगारही आगाऊ घेतात, तर काही लोक बँकाकडून कर्ज घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते.

जर सध्या तुम्हाला पैशांची गरज आहे, आणि तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी बँक घेऊन आलो आहोत, जी कर्ज कमी व्याजदरासह ऑफर करत आहेत. तसेच प्रक्रिया शुल्कही माफ करत आहेत.

आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वैयक्तिक कर्जाबद्दल बोलत आहोत. SBI ने पगारदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाची विशेष ऑफर आणली आहे जी 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या ऑफरची खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला कर्ज देण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची गरज नाही किंवा बँक तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही. या बँकेद्वारे तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा जाणून घ्या…

तुम्हाला जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही

या कालावधीत बँक तुमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क आकारणार नाही. या कर्जासाठी तुमच्याकडे 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, कंपनीचा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्जाची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कमी व्याजदराने मिळेल.

तुम्हाला किती कर्ज मिळेल?

SBI नुसार, हे कर्ज घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान 15 हजार रुपये असावा. तुमचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत बँक तुम्हाला 24 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देईल. हे कर्ज 1 वर्ष ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाईल. तथापि, यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर 750 आणि त्याहून अधिक असावा.

तुमचे SBI मध्ये खाते नसले तरी तुम्हाला कर्ज मिळेल?

तुमचे पगार खाते SBI बँकेत नसले तरी तुम्हाला हे कर्ज सहज मिळू शकते. बँकेवर अवलंबून, तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइटवरील कर्जाच्या पर्यायावर जाऊन तुमची सर्व माहिती देऊ शकता आणि सर्व आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बँक तुम्हाला ५ दिवसांच्या आत कर्ज देईल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts