Fixed Deposit : जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा प्रथम नाव मनात येते ते म्हणजे एफडी. एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मुदत ठेव हा कमी जोखीम आणि उच्च परतावा असलेला पर्याय आहे. म्हणूनच बरेचजण येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
एफडीमध्ये आज जवळ-जवळ सर्वच नागरिक गुंतवणूक करताना दिसतात. अगदी लहान व्यक्तीपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच येथे गुंतवणूक करून उत्तम परतावा कमावत आहेत.
तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल आणि FD वर जास्त व्याज देणारी बँक शोधत असाल तर. तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकतेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात बदल केले आहेत. बँक आता पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहे.
व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर देते. तर 15 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याज दर 8.50 टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी सर्वाधिक 9 टक्के व्याजदर आहे. नवीन दर 7 मार्च 2024 पासून लागू झाले आहेत. तरी तुम्ही यात आता गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकता.
लक्षात घ्या 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी केवळ Platina FD द्वारे ऑफर केलेल्या 0.20 टक्के अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र असतील. उज्जीवन SFB साठी उपलब्ध व्याज पेमेंट पर्याय मासिक, त्रैमासिक आणि मुदतपूर्तीवर आहेत.