आर्थिक

मोठी बातमी ! ‘या’ बड्या बँकेने वाढवले एफडीसाठीचे व्याज, 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार नवीन दर, वाचा डिटेल्स

SBI FD Rates : अलीकडे गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी हा एक सुरक्षित आणि अतिशय उत्कृष्ट असा पर्याय समोर आला आहे. खरे तर आधी देखील लोक बँकेत एफडी करत होते आधी एफडीवर खूपच कमी व्याजदर मिळत असे. पण गेल्या काही वर्षांपासून देशातील जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. यामुळे एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळू लागला आहे.

परिणामी बँकेत फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान जर तुम्हीही संसाराच्या गरजा भागवून साठवलेली रक्कम एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच देशातील एका बड्या बँकेने एफडीसाठीचे व्याजदर वाढवले आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडी चे व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान आता एसबीआयने एफडीचे व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले असल्याने भविष्यात इतरही बँका एफडीचे व्याजदर वाढवतील अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आता आपण एसबीआयने कोणत्या एफडी योजनांचे व्याजदर वाढवले आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SBI ने वाढवलेत FD चे व्याजदर

SBI ने एफडीचे व्याजदर वाढवण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या बँकेच्या माध्यमातून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 50 आधार अंकांनी FD चे व्याजदर वाढवण्यात आले असून आता या कालावधीच्या एफडी साठी 3.50 टक्के व्याज मिळणार आहे. याशिवाय 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 25 आधार अंकांनी वाढ झाली असून आता गुंतवणूकदारांना या कालावधीच्या एफडी साठी 4.75 टक्के एवढे व्याज मिळणार आहे.

तसेच 180 ते 210 दिवसांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ झाली असून हे दर आता 5.75 टक्के झाले आहेत. 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्स एवढी वाढ झाली असून या कालावधीच्या एफडीसाठी आता गुंतवणूकदारांना 6 टक्के आणि 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 25 बेस पॉईंट्सने वाढले असून या कालावधीतील एफडीसाठी आता गुंतवणूकदारांना 6.75 टक्के एवढ्या व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे हे नवीन तर आजपासून अर्थातच 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. निश्चितच एसबीआयने घेतलेला हा निर्णय लाखो ग्राहकांसाठी दिलासा देणारा राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: FD Rates

Recent Posts