Affordable Life Insurance:- सध्या मोठ्या प्रमाणावर विमा पॉलिसी खरेदी केले जातात व आर्थिक भविष्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचे देखील आहे. परंतु जर आपण अशा जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियम बघितले तर खूपच जास्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारच्या पॉलिसी घेणे परवडत नाही व त्यामुळे अनेकजण जीवन विमा पॉलिसी घेण्यापासून किंवा विमा संरक्षणापासून दूर राहतात.
परंतु जीवन विमा घेणाऱ्यांसाठी जर बघितले तर देशात अशी एक कंपनी आहे की ती फक्त 45 पैशांमध्ये दहा लाख रुपयांचे विमा पॉलिसी देते व हे जर आपण ऐकले तर आपला विश्वास बसणार नाही.
परंतु इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून प्रवाशांसाठी विशेष आणि परवडणारा विमा दिला जातो व ही योजना खास प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना फक्त परवडणारी नाही तर प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक चांगला पर्याय आहे.
आयआरसीटीसी विमा योजनेचे उद्दिष्ट
आयआरसीटीसीच्या माध्यमातून देण्यात येणारी ही विमा योजना भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी खास करून तयार करण्यात आली आहे. ही योजना रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळी उपलब्ध करून देण्यात आली असून ज्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना फक्त 45 पैसे अतिरिक्त द्यावे लागतात. रेल्वे प्रवासादरम्यान संभाव्य अपघातांपासून प्रवाशांना संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
आयआरसीटीसी विमा योजना अंतर्गत मिळणारा कव्हरेज आणि इतर फायदे
या विमा योजनेअंतर्गत प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. या अंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या कुटुंबांना दहा लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते व इतकेच नाही तर रेल्वे अपघातात कायमचे अपंगत्व आले तर साडेसात लाख रुपयांची भरपाई मिळते.
आंशिक अपंगत्वासाठी दोन लाख रुपये तर रेल्वे अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च देखील दिला जातो. याशिवाय अचानक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देखील दिली जाते.
कुणाला मिळतो या विमा योजनेचा लाभ?
आयआरसीटीसी विमा योजना फक्त त्या प्रवाशांसाठी लागू आहे ज्या आयआरसीटीसी वेबसाईट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून तिकीट बुक करतात. ही सुविधा सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवासासाठी उपलब्ध आहे.
या विमा योजनेचा लाभ कसा घ्याल?
या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते खूप सोपे आहे. जेव्हा प्रवासी आयआरसीटीसी वेबसाईट किंवा एप्लीकेशनच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करतात तेव्हा विम्याचा पर्याय आपोआप त्या ठिकाणी दिसतो व हा पर्याय निवडून प्रवाशाला 45 पैसे अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे.
म्हणजे तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर लगेचच विमा पॉलिसी सक्रिय होते. या योजनेकरिता आयआरसीटीसीने विविध विमा कंपन्यांशी भागीदारी केली आहे व यामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.
तसेच ही योजना संपूर्ण भारतात उपलब्ध आहे व दावा प्रक्रिया सोपी आणि अत्यंत जलद आहे व त्यामुळे पीडित कुटुंबाला ताबडतोब मदत मिळते.