आर्थिक

PNB Offer : पंजाब नॅशनल बँकेची ‘ही’ धमाकेदार ऑफर, कर्जदारांना होणार फायदा..

PNB Offer : बँक पंजाब नॅशनल बँकेने सणासुदीच्या काळात धमाकेदार ऑफर दिली असून, सणांच्या पार्श्वभूमीवर, PNB बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मेगा फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांसाठी कर्ज घेणे स्वस्त करण्यात आले असून जाणून घ्या ऑफर बद्दल.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी केली असून, या ऑफर अंतर्गत, बँकेने गृहकर्ज, कार कर्जासह महत्त्वाच्या रिटेल उत्पादनांवरील आगाऊ किंवा प्रोसेसिंग फीस आणि डॉक्यूमेंटेशन चार्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.

झिरो प्रोसेसिंग फीस

पीएनबीकडून कार कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्कासह कोणतेही दस्तऐवज शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, जर एखाद्या ग्राहकाने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची परतफेड केली तर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे अपफ्रंट शुल्क घेतले जाणार नाही.

PNB कार लोन ऑफर 

PNB ने सोशल मीडियावर याबाबत अधिकृत माहिती शेअर केली असून, ज्यामध्ये PNB कार लोन अंतर्गत कोणत्याही वाहनाच्या एक्स-शोरूम किंमतीच्या 100 टक्के पर्यंत कर्ज दिले जात असल्याचे म्हटले आहे. यासोबतच ईव्ही खरेदीवर 120 महिने म्हणजेच 10 वर्षांच्या कर्जाची परतफेड करण्याची सुविधा दिली जात आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधी कमाल 84 महिने आहे.

 कार कर्जावरील व्याज

पंजाब नॅशनल बँक 8.75 टक्के प्रारंभिक व्याज दराने कारसाठी कर्ज देत असून, यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे असते. यासाठी 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असणे. 700 ते 750 क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो, 651-700 क्रेडिट स्कोअर वाजवी मानला जातो आणि 650 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर खराब मानला जातो

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts