FD Rates Hike : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI आपल्या 180 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के व्याज देत आहे. एसबीआयने नुकतेच मे महिन्यात एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली होती. आता बँक आपल्या एफडीवर 0.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. बँकेने 2 कोटींवरील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेचे व्याजदर पुढीलप्रमाणे :-
स्टेट बँक ऑफ इंडिया
7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४ टक्के
46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्येष्ठ नागरिक SBI व्याज दर) – 6 टक्के
180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य (उच्च परतावा FD) लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सर्वसाधारण (फिक्स्ड डिपॉझिट) लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सर्वसाधारण (FD व्याजदर वाढ) लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.
(SBI We care FD रेट अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते.)
बल्क एफडीवरील व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बल्क एफडीचे व्याजदर देखील वाढवले आहेत. बँक आता 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 5.00 टक्क्यांऐवजी 5.25 टक्के व्याज सर्वसामान्य ग्राहकांना देणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना 5.50 टक्क्यांऐवजी 5.75 टक्के (फिक्स्ड डिपॉझिट व्याज वाढ) दराने व्याज मिळेल. बँकेने 46 ते 179 दिवसांच्या FD वरील व्याजदरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. आता बँक सर्वसामान्य ग्राहकांना 5.75 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्क्यांऐवजी 6.75 टक्के व्याजदर देत आहे.