आर्थिक

गुजरात मधील ‘हा’ शेतकरी करतो चक्क गाढवाच्या दुधाचा व्यवसाय! महिन्याला कमवतो 3 लाख रुपये

शेतीला प्रमुख असलेले जोडधंदे जर पाहिले तर यामध्ये पशुपालन व्यवसाय व त्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय भारतामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. त्यानंतर शेळीपालन तसेच कुक्कुटपालना सारखे जोडधंदे मोठ्या प्रमाणावर केले जातात. शेती उत्पन्नाला जोड म्हणून अशा धंद्यांचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक आधार लागतो.

सध्या या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आल्यामुळे आता पशुपालन व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. दुग्ध व्यवसायामध्ये प्रामुख्याने म्हशी आणि गाईंचे पालन व शेळीपालन काही अंशी केले जाते.

परंतु गाय व म्हशींच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय आज शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परंतु गुजरात मधील धीरेन सोळंकी या शेतकऱ्याने मात्र चक्क बेचाळीस गाढवांचा गोठा उभारला व त्या माध्यमातून गाढवाच्या दुधाचा व्यवसाय सुरू करून आज हा शेतकरी लाखो रुपये कमवत आहे.

 धिरेन सोळंकी यांनी सुरू केला गाढवाच्या दुधाचा व्यवसाय

गुजरात राज्यातील धीरेन सोळंकी यांनी पाटण मध्ये 42 गाढवांचा गोठा तयार केला असून या गाढवांच्या दुधाचा व्यवसायाच्या माध्यमातून ते लाखो रुपये कमवत आहेत. धिरेन हे शिक्षण घेतल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात होते. परंतु नोकरी करून कुटुंबाचा खर्च भागणार नाही हे त्यांना समजून आले व त्यांनी दक्षिण भारतामध्ये गाढवाबद्दल व्यवस्थित माहिती मिळवली व काही लोकांच्या मार्गदर्शनाने आठ महिन्यापूर्वीच गाढवांचा फार्म सुरू केला.

सुरुवातीला यामध्ये त्यांना अनेक प्रकारचे व्यावसायिक समस्या आल्या. त्यांनी ज्या भागांमध्ये हा व्यवसाय सुरू केला होता त्या भागामध्ये या दुधाला काहीच मागणी नसल्यामुळे अगोदरच्या पाच महिन्यात त्यांना काहीही कमाई करता आली नाही. परंतु हार न म्हणता त्यांनी व्यवसायामध्ये सातत्य ठेवले.

गाढवाच्या दूधाची विक्री करायची कसी हा मोठा प्रश्न असताना त्यांनी वेगवेगळे पर्याय शोधले. या प्रयत्नांचाच भाग म्हणून त्यांना कर्नाटक राज्यातील आणि केरळ मधील काही कंपन्यांशी संपर्क साधण्यात यश आले.

या राज्यांमध्ये असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनाच्या अनेक कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाकरिता गाढवाच्या दुधाची आवश्यकता असते व हे दूध खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे याला भाव देखील जास्त मिळतो.

भारतामध्ये या दुधाला इतकी मागणी नाही परंतु जर आपण जगाच्या पाठीवरील चीन तसेच मलेशिया सारखे देश पाहिले तर या देशांमध्ये या दुधाला खूप मोठी मागणी आहे.

जर आपण गाढवाच्या दुधाचा लिटरचा भाव बघितला तर तो 3500 रुपये प्रतिलिटर इतका आहे व या दुधाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील चांगले स्थान आहे.

यासगळ्या संधी ओळखून धीरेन सोळंकी यांनी हा व्यवसायामध्ये नशीब आजमावायचे ठरवले व आज महिन्याकाठी तीन लाख रुपये पर्यंत कमाई ते करत आहेत.

 सुरुवातीला आला तोटा

जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला व गाढवाचे दुधाचे उत्पादन त्यांना मिळायला लागले तेव्हा हे दूध विकायचे कसे हेच माहीत नसल्यामुळे त्यांना सुरुवातीला 40 लिटर दूध फेकून देण्याची वेळ आली. नंतर त्यांना समजले की या दुधाची पावडर बनवता येते व त्याची वाहतूक देखील करता येऊ शकते.

त्यानंतर त्यांनी परदेशात वाहतूक करण्याचा निर्णय घेतला व आज आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्याकडून गाढवाच्या दुधाची पावडर तब्बल 63 हजार रुपये किलो दराने विकली जाते.

अगोदर विस गाढवांच्या फार्म पासून त्यांनी सुरुवात केली व हळूहळू त्यामध्ये ते वाढ करत असून सुरुवातीला 37 लाख रुपयांचा त्यांना खर्च आलेला आहे.

परंतु सौंदर्यप्रसाधनांच्या अनेक औषधांमध्ये या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विदेशातून चांगली मागणी असल्यामुळे या दुधाचे उत्पादन कमी असल्याने याला प्रचंड अशी किंमत मिळते.  आता महिन्याकाठी या शेतकऱ्याची कमाई तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts