आर्थिक

हातातून नोकरी गेली तर आर्थिक परिस्थिती होऊ शकते वाईट; अशापद्धतीने आधीच पैशांची तयारी करा,‘या’ टिप्स ठरतील फायद्याच्या

पैसा हा जीवन उत्तम पद्धतीने जगण्यासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे साधन असल्याने प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय करून पैसे कमावतात व आपल्या जीवनातील गरजा भागवतात व समृद्धपणे जीवन कसे जगता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. कारण पैशाशिवाय जीवन जगणे महाकठीण आहे.

अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून जेव्हा सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या कारणांकरिता पैसा लागतो. याकरिता पैसा हा अत्यंत गरजेचा आहे. परंतु कधीकधी आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणाहून आपल्याला काढून टाकण्याची किंवा नोकरी गमावण्याची भीती असते किंवा भविष्यात अशी नोकरी जाऊ शकते.

जर आपला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत फक्त नोकरी गेली तर मात्र बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे भविष्यकाळात निर्माण होऊ शकणाऱ्या या संभाव्य परिस्थितीपासून  वाचण्यासाठी तुम्ही आतापासूनच काही तयारी करून ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे आर्थिक नियोजन करून ठेवणे गरजेचे आहे.

 नोकरी जायची भीती असेल तर अगोदरच करून ठेवा अशा पद्धतीने तयारी

1- इमर्जन्सी फंड अर्थात आपत्कालीन निधी तयार ठेवणे जो ही व्यक्ती नोकरी करतो अशा लोकांनी नेहमी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसा कामी येईल याकरिता आपत्कालीन निधी तयार ठेवणे गरजेचे असते. अशा पद्धतीचा आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी तुमच्या महिन्याच्या पगारातून तुम्ही काही ठराविक रक्कम बचत खात्यामध्ये जमा करू शकता.

या माध्यमातून तुम्ही सहा ते बारा महिने खर्च करिता पुरतील एवढी रक्कम जमा केली की ती तुम्ही लिक्विड फंड किंवा बँकेत एफडी करून गुंतवू शकतात. परंतु लक्षात ठेवावे की अशा पद्धतीची बचत किंवा फंड तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्येच वापरावा.

2- आरोग्य विमा घेणे बरेच जण कंपन्यांमध्ये काम करतात व अशा कंपन्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला जातो. परंतु जर आपली संबंधित कंपनीतून नोकरी गेली तर आपला कंपनीच्या माध्यमातून देण्यात येणारा आरोग्य विमा देखील थांबतो.

अशाप्रसंगी जर घरामध्ये किंवा तुम्हाला अचानक वैद्यकीय परिस्थितीला सामोरे जावे लागले तर आर्थिक संकट आणखीन वाढण्याची शक्यता असते व या पद्धतीचे आर्थिक संकट तुमची बचत देखील खाऊ शकते. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी घेणे गरजेचे आहे.

3- उत्तम पोर्टफोलिओ तयार करणे तुम्ही ज्याही पद्धतीने गुंतवणूक करतात त्याचा पोर्टफोलिओ म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही सोने, रोखे तसेच रिअल इस्टेट यासारख्या ठिकाणी गुंतवणूक करून पोर्टफोलिओ तयार करू शकतात. त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की एका मालमत्तेत जरी तुम्हाला नुकसान झाले किंवा घट आली तर दुसऱ्यामध्ये वाढ होऊ शकते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर शेअर बाजारामध्ये जेव्हा घसरण व्हायला सुरुवात होते तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही गरजेनुसार कर्ज किंवा सोन्यात गुंतवणुकीची पूर्तता करू शकतात.

4- आधी बचत करा नंतर खर्च करा सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिन्याला तुमचा जो काही पगार आहे तो तुमच्या हातात पडल्यानंतर तुमची नियमित महिन्याला असलेली गुंतवणूक किंवा बचतीसाठी पैसा तात्काळ बाजूला काढावा व तरच उरलेली रक्कम खर्च करावी. नाहीतर मग आधी खर्च करून उरलेले पैसे गुंतवायचे ही पॉलिसी योग्य नाही. तुमचा  जो काही पगार असेल त्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीची खात्री करा व तेवढी रक्कम काही झाले तरी गुंतवा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts