Fixed Deposit : सणासुदीच्या दिवसांत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना नाराज केले आहे. सणांच्या या दिवसांत ग्राहकांना बँकेकडून अपेक्षा होती, बँक या दिवसात आपल्या एफडी व्याजदरात वाढ करेल, पण बँकेने असा कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे ग्राहक आता नाराज आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) उघडण्यासाठी भारतीयांची पहिली पसंती आहे. सरकारी बँकांमधील एकूण मुदत ठेवींमध्ये या बँकेचा वाटा 36 टक्के आहे.
मात्र, या दिवाळीत बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. SBI बँकेने फेब्रुवारी 2023 पासून मुदत ठेव सुधारित केलेली नाही. तेव्हापासून SBI ने FD वरील व्याज वाढवले नाही किंवा कमी केले नाही. SBI सध्या FD वर इतके व्याज देत आहे. बघा…
SBI च्या FD वर व्याजदर
7 दिवस ते 45 दिवसांची FD: बँक सर्वसामान्यांना 3% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% व्याज देत आहे.
46 दिवसांपासून 179 दिवसांची FD: बँक सर्वसामान्यांना 4.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 5% व्याज देत आहे.
180 दिवस ते 210 दिवसांची FD: बँक सर्वसामान्यांना 5.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75% व्याज देत आहे.
11 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची FD: बँक सर्वसामान्यांना 5.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25% व्याज देत आहे.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD: बँक सर्वसामान्यांना 6.8% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याज देत आहे.
2 वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD: बँक सर्वसामान्यांना 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देत आहे.
3 वर्षापासून 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD: बँक सर्वसामान्यांना 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7% व्याज देत आहे.
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतची FD: बँक सर्वसामान्यांना 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याज देत आहे.
SBI ची अमृत कलश योजना
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI देखील आपल्या ग्राहकांना 400 दिवसांची विशेष FD ऑफर करत आहे. ‘SBI अमृत कलश’ असे या योजनेचे नाव आहे. SBI च्या योजनेअंतर्गत, सामान्य ग्राहकांना 400 दिवसांच्या FD वर 7.10% व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
SBI सोडली तर खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या एफडी दर वाढवले आहेत. तसेच स्मॉल फायनान्स बँका देखील एफडीवर उत्तम परतावा देत आहेत. यातीलच एक Fincare Small Finance Bank आपल्या ग्राहकांना 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहे.