Multibageer Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. अशातच तुम्हीही सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक स्टॉक घेऊन आलो आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला आहे.
गेल्या तीन वर्षात मल्टीबॅगर अपार इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पॉवर इक्विपमेंट मेकरचा स्टॉक, तीन वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट 2020 रोजी, 302.65 रुपयांवर व्यवहार करत होता. आज हा तो 4060 वर पोहोचला आहे. शुक्रवारी व्यवहारादरम्यान शेअरने 4089 रुपयांची पातळी गाठली.
जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा नफा 122.46 कोटी रुपये होता. त्या तुलनेत 2023 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 61.22 टक्क्यांनी वाढून 197.43 कोटी रुपये झाला आहे. जून 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात 22.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत 3097 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत जून 2023 च्या तिमाहीत 3786 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तिमाही निकालानंतर, हा स्टॉक 7,000 रुपयांचे लक्ष्य गाठेल असे तज्ञांनकडून सांगितले जात आहे.
स्टॉक 7000 पर्यंत जाईल का?
अपार इंडस्ट्रीज ही एक अग्रगण्य कंडक्टर उत्पादक आणि ट्रान्सफॉर्मर तेलाची तिसरी सर्वात मोठी जागतिक उत्पादक आहे. कंपनी प्रामुख्याने निर्यात आणि प्रीमियम उत्पादने वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. याशिवाय, गेल्या 5 वर्षांत 35% CAGR दराने नफ्यात वाढ नोंदवली आहे.
दीर्घ मुदतीसाठीच्या शक्यता खूप चांगल्या आहेत कारण गेल्या 4 तिमाहीत स्टॉकने असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे. सध्याच्या स्तरांवरून, स्टॉक दीर्घ मुदतीसाठी 7,000 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. अशी अपेक्षा आहे.
कंपनी काय बनवते?
अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंडक्टर, विविध प्रकारच्या केबल्स, विशेष तेल, पॉलिमर यांची निर्माता आणि पुरवठादार आहे. कंपनीच्या विभागांमध्ये कंडक्टर, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि पॉवर/टेलिकॉम केबल्सचा समावेश होतो.