Fixed Deposit : जुलै महिना सुरू होताच देशातील अनेक बँकांनी एफडीचे दर बदलले आहेत. यातलीच एक खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने एफडीचे व्याजदर बदलले आहेत. बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ही घोषणा केली आहे. तुम्ही जर मुदत ठेव अर्थात FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही इंडसइंड बँकेचे नवीन व्याजदर पाहू शकता.
बदलानंतर, इंडसइंड बँक सामान्य ग्राहकांना 3.50 टक्के ते कमाल 7.75 टक्के व्याज देत आहे. बँक सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे. बँकेकडून बदल झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 8.25 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे. हे नवीन दर 3 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत.
इंडसइंड बँक एफडी दर
7 ते 30 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडी दरांवरील व्याज – 3.50 टक्के
31 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर व्याज – 3.75 टक्के
46 ते 60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.75 टक्के
61 ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.75 टक्के
91 ते 120 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 4.75 टक्के
121 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 5 टक्के
181 ते 210 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 5.85 टक्के
211 ते 269 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.1 टक्के
270 ते 354 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.35 टक्के
355 ते 364 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 6.50 टक्के
1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 7.75 टक्के
1 वर्ष ते 6 महिने ते 2 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर व्याज – 7.75 टक्के
2 वर्षे ते 3 ते 2 वर्षे आणि 6 महिने FD वर व्याज – 7.25 टक्के
FD वर 2 वर्षे 6 महिने ते 2 वर्षे 7 महिने व्याज – 7.25 टक्के
2 वर्षे 7 महिने ते 3 वर्षे 3 महिने – 7.25 टक्के
3 वर्षे 3 महिने ते 61 महिने – 7.25 टक्के
61 महिने आणि त्याहून अधिक – 7 टक्के
5 वर्षांसाठी कर बचत एफडीवर व्याज – 7.25 टक्के