आर्थिक

Post Office : पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची; फक्त 100 रुपयांपसून करू शकता गुंतवणूक…

Post Office : कोरोनानंतर सर्वांनाच बचतीचे महत्व समजले आहे, अशातच आज प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्याकडे वळत आहे. प्रत्येकजण सध्या आपल्या पगारीतला काही भाग बाजूला काढून बचत करत आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते म्हणून येथे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

जर तुम्हीही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसची आरडी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, यामध्ये तुम्ही डोळे झाकून पैसे जमा करू शकता. पोस्ट ऑफिस ही एक बँक आहे जी तुमचे पैसे 100 टक्के सुरक्षित ठेवते.

याशिवाय, हे तुम्हाला हमी परतावा देखील देते, यामध्ये पैसे गमावण्याची धोका नसतो. आजच्या या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

या योजनेत तुम्ही दरमहा 100 रुपये रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, यात गुंतवणूक मर्यादा नाही, या योजनेत तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. दरमहा ठराविक रक्कम जमा करून कालावधी संपल्यानंतर तुम्हाला जमा रकमेवर व्याजासह तुमची पूर्ण रक्कम मिळते. लक्षात घ्या मुदतीपूर्वी तुम्हाला तुमची जमा रक्कम हवी असेल तर त्यावर तुम्हाला दंड आकाराला जातो.

आवर्ती ठेव योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही एकल खाते, संयुक्त खाते आणि तीन लोकांसह उघडू खाते शकता. तसेच कोणताही सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांखालील अल्पवयीन मूल, मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, कोणताही भारतीय नागरिक, श्रीमंत किंवा गरीब, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे आरडी खाते उघडू शकतो.

तुम्ही ते दोन प्रकारे उघडू शकता, प्रथम, पोस्ट ऑफिस बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन खाते उघडा किंवा दुसरे, तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी योजनेसाठी खाते उघडा.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम खाते उघडण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts