आर्थिक

Multibagger Stocks : अबब…! 2 रुपयांवरून तब्बल 85 च्या वर गेला ‘हा’ शेअर; फक्त तीन वर्षात दिला इतका परतावा!

Multibagger Stocks : जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही दिवसांपासून खूप चांगला परतावा दिला आहे. या शेअरमध्ये तीन वर्षात कमालीची वाढ पाहायला मिळाली.

आम्ही सध्या सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्सच्या शेअरबद्दल बोलत आहोत, मंगळवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्केच्या वाढीसह 85.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीचे शेअर्स आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशीही वरच्या सर्किटवर राहिले.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 108.70 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17.53 रुपये आहे.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 1.99 रुपयांवर होते. तर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सचे शेअर्स 2 एप्रिल 2024 रोजी 85.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स सुमारे 4200 टक्के वाढले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने 4 नोव्हेंबर 2021 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या या शेअर्सचे सध्याचे मूल्य 42.96 लाख रुपये झाले असते.

सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 353 टक्के वाढ झाली आहे. 3 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 18.90 रुपये होते. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सचे शेअर्स 2 एप्रिल 2024 रोजी 85.50 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, गेल्या 2 वर्षांत, सर्वोटेक पॉवर सिस्टम्सच्या शेअर्समध्ये प्रचंड 819 टक्के वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 9.31 रुपयांवर होते. तर 2 एप्रिल 2024 रोजी 85.50 रुपयांवर पोहोचले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts