आर्थिक

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांची चांदी! रॉकेटच्या वेगाने धावत आहे ‘हा’ शेअर, किंमत फक्त चार रुपये…

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना GTL Infrastructure Limited या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअरने वेड लावले आहे. हा स्टॉक गेल्या आठवड्यात सतत 5 टक्के वरच्या सर्किटमध्ये आहे. या आठवड्याच्या गुरुवारी हा शेअर 3.96 रुपयांवर बंद झाला होता, जो शुक्रवारी 4.15 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

याच दिवशी ऑगस्ट 2023 मध्ये हा शेअर 0.70 पैशांचा होता. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. जर आपण शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर प्रवर्तकांकडे 3.28 टक्के हिस्सा आहे. याशिवाय सार्वजनिक भागधारकांकडे 96.72 टक्के हिस्सा आहे.

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्येही भागीदारी आहे. या कंपनीत LIC ची 3.33 टक्के हिस्सेदारी आहे. LIC व्यतिरिक्त अनेक मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनीही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचा 12.07 टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा 7.36 टक्के आणि बँक ऑफ बडोदाचा 5.68 टक्के हिस्सा आहे. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेकडे 5.23 टक्के हिस्सा आहे तर कॅनरा बँक आणि ICICI बँकेकडे अनुक्रमे 4.05 टक्के आणि 3.33 टक्के हिस्सा आहे.

कंपनी काय करते?

GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची दूरसंचार टॉवर कंपनी आहे, जी विविध प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदान करते. भारतातील 22 दूरसंचार मंडळांमध्ये कार्यरत असलेल्या 28,000 हून अधिक दूरसंचार टॉवर्सच्या विशाल नेटवर्कसह, GTL इन्फ्रा त्याच्या उच्च नेटवर्क उपलब्धतेसाठी आणि अपटाइमसाठी ओळखले जाते.

मार्च तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 331.1 कोटी रुपयांची विक्री केली, जी एका वर्षापूर्वीच्या 377.87 कोटींच्या विक्रीच्या तुलनेत 12.4 टक्के कमी आहे. कंपनीला 214.7 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts