आर्थिक

Multibagger Stock : भारीचं की ! 4 रुपयांचा ‘हा’ शेअर पोहोचला 1100 रुपयांवर, गुंतवणूकदार करोडपती !

Multibagger Stock : कमी वेळात सगळ्यांनाच श्रीमंत व्हायचे असते, पण ते इतके सोपे नाही. पण ज्या व्यक्तीला शेअर मार्केटचे थोडेसे ज्ञान आहे, तो नक्कीच कमी वेळात श्रीमंत होऊ शकतो. शेअर बाजारात अशा अनेक कंपन्यांचे शेअर्सही आहेत. ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

येथील गुंतवणूक जरी जोखमीची असली तरी देखील येथील परतावा बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. जर तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त शेअर घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही कमी वेळात श्रीमंत होऊ शकता.

आजच्या या लेखात आम्ही अशाच एका कंपनीच्या शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ऑलेक्ट्रा ग्रीनटेक असे आहे. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. एक काळ असा होता की या कंपनीच्या शेअरची किंमत 4 रुपयांपेक्षा कमी होती, पण आज त्याची किंमत 1100 रुपयांच्या पुढे गेली आहे.

25 जून 2004 रोजी NSE वर Olectra Greentech शेअरची बंद किंमत 3.90 होती. यानंतर, शेअरमध्ये थोडी वाढ झाली आणि 2008 पर्यंत शेअरच्या किंमतीने 50 रुपयांचा टप्पा ओलांडला. मात्र, त्यानंतर शेअरच्या किमतीत घसरण झाली आणि 2008 ते 2016 या कालावधीत शेअरची किंमत 10 ते 25 रुपयांच्या दरम्यान राहिली.

त्याच वेळी, वर्ष 2016 नंतर शेअरमध्ये तेजी आली आणि 2017 मध्ये शेअरचा भाव 200 रुपयांच्या पुढे गेला. 2020 मध्ये, कोविडमुळे, स्टॉकमध्ये घट झाली आणि स्टॉकची किंमत 55 रुपयांच्या खाली गेली. तथापि, 2021 पासून, स्टॉकमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. 2023 मध्येच, स्टॉकने प्रथमच 1000 रुपयांचा टप्पा ओलांडला. आता 4 ऑगस्ट रोजी NSE वर शेअरची बंद किंमत 1137.95 रुपये आहे.

त्याच वेळी, या स्टॉकची आतापर्यंतची उच्च किंमत 1465 रुपये आहे. तसेच कंपनीच्या शेअरची नीचांकी किंमत 374.10 रुपये आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने 2004 साली या कंपनीचे शेअर्स 4 रुपये दराने खरेदी केले असते आणि एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्या व्यक्तीकडे कंपनीचे 25000 शेअर्स असते आणि या शेअर्सची किंमत 1137 रुपये दराने 2,84,25,000 रुपये झाली असती.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts