अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Health News :-भारतात प्रत्येकांच्या घरात मधुमेह आजाराची लक्षणे आढळून येते आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची साखरेची पातळी सामान्य कशी राहील याची सर्वाधिक चिंता असते. शुगर लेव्हल (Suger Level) नॉर्मल ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.
मधुमेह आजार पासून आपण लवकरात लवकर कसे नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापराबद्दल माहिती देत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन बंद होतो. त्यासाठी दालचिनी चहा मधुमेहासाठी आवश्यक आहे.
दरोरोज दालचिनीचे सेवन केल्याने शुगरची पातळी नियंत्रित राहते. दालचिनीमध्ये कशा कशाचे प्रमाण असतात. त्यामध्ये अमीनो अॅसिड, फायबर, मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या अँटी-ऑक्सिडंट्स असे भरपूर प्रमाणात असतात.
दालचिनीचा चहा कसा बनवायचा? दालचिनीचा चहा आपण घरी बनवू शकतो. त्यासाठी २ कप पाणी टाका. त्यानंतर त्यात १ दालचिनीची काडी टाका. परत १ चीमटभर ओवा टाका. तसेच काळे मिट टाका. १० मिनिटे उकळू द्या. पातील्यात १ कप पाणी राहिल्यानंतर गॅस बंद करा आणि ऐका कपात चहा गाळून घ्या, आणि आता तुम्ही तो चहा पिऊ शकता.
दुधासोबतही सेवन शुगरची पातळी सामान्य राहण्यासाठी दुधासोबत दालचिनी पावडर चा वापरत करण्यात यावा, त्यासाठी १ कप दुधात २ चमचे पावडर मिसळून रोज द्यावे. हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.