रत्नागिरी : फळांचा राजा मानून ओळखला जाणारा हापूस आंबा (Mango) यंदा चांगलाच महाग होणार आहे. त्यामुळे आंब्याची चव हवीहवीशी वाटताना नकळत खिशाला झळ बसणार आहे.
हिवाळा (Winter) ऋतू संपून आता उन्हाळ्याच्या (summer) दिशेने वाटचाल चालू आहे. मात्र दररोजच्या वातावरणातील बदलांमुळे आंबा फळांसोबत सोबत इतरही पिकांना फटका बसत आहे.
ज्यावेळी आंबा मोहराच्या भरात होता तेव्हा रत्नागिरी (Ratnagiri) व कोकण (Kokan) भागात अवकाळी गारपीट झाली होती. त्यामुळे आंब्याचा मोहर पूर्णपणे झडून गेला आहे. त्यामुळे आंबा शेतकऱ्याच्या (Farmer) उत्पादनात घट होणार आहे. याचा थेट फटका बाजारभावावर होणार असून आवक घातल्याने आंब्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
यावर्षी एकूण उत्पादनापैकी केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन बागायतदारांच्या पदरी पडणार आहे. आत्ता सध्या बाजारपेठेत हापूसची आवक सुरु झाली आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहक याला कसा प्रतिसाद देणार ते पहावे लागणार आहे.
तीन टप्प्यात घेतलं जात आंब्याचे उत्पादन
कोकणात आंब्याचे उत्पादन हे तीन टप्प्यात घेतले जाते. जानेवारी महिन्यापासूनच याची सुरवात होते. पण याच कालावधीपासून सुरु झालेल्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. निसर्गाच्या अवकृपेमुळे तीन्हीही टप्प्यातील उत्पादन वेळेत शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. परिणामी अधिकचा खर्च करुनही शेतकऱ्यांचे उद्दीष्ट मात्र, साध्य झाले नाही.
जानेवारीपासून १ लाख पेट्यांमधून हापूसची आवक
प्रतिकूल परस्थितीमध्येही जानेवारी महिन्यापासून मार्चपर्यंत येथील मुंबईतील वाशी मार्केट १ लाख पेट्यांमधून हापूसची आवक झाली आहे. तर १० हजार पेट्यांची निर्यात ही आखाती देशांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये दुबई, ओमान आणि कुवेत या देशांचा समावेश आहे.