आर्थिक

Post Office FD : सावधान..! पोस्टात एफडी करणाऱ्यांना ‘ही’ चूक पडेल चांगलीच महागात !

Post Office FD : तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसने एफडी वेळेपूर्वी काढण्याच्या नियमात काही महत्वाचे बदल केले आहे. या नियमामुळे ग्राहकांना वेळेपूर्वी एफडी काढणे चांगलेच महागात पडणार आहे. काय आहे नियम? आणि तुमच्यावर कसा परिणाम करेल, जाणून घेऊया… 

पोस्टाने लागू केलेल्या नियमाअंतर्गत जर तुम्ही 5 वर्षांची FD चार वर्षांनंतर काढली, तर तुम्हाला बचत खात्यावरील चालू व्याजमिळतील. हा मोठा बदल नुकताच करण्यात आला आहे. यामुळे, जर तुम्ही 5 वर्षांची FD मुदतीपूर्वी काढली, तर तुम्हाला ठेव कालावधीसाठी बचत खात्याचा व्याजदर दिला जाईल.

उदाहरणार्थ, एका व्यक्तीने 7.5 टक्के व्याजाने पाच वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली आहे. चार वर्षांनंतर, जर त्याला अचानक पैशांची गरज भासली आणि त्याने मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय निवडला, तर त्याला 7.5 टक्क्यांऐवजी, बचत खात्यावर प्रचलित असलेल्या 4 टक्के दराने व्याज दिले जाईल. अशा परिस्थितीत, एफडी करणाऱ्या व्यक्तीला एफडीवर 3.5 टक्के थेट नुकसान होऊ शकते.

1, 2 आणि 3 वर्षांची एफडी मुदतपूर्व काढण्याचे नियम

तसेच एक, दोन आणि तीन वर्षांची एफडी मुदतपूर्व काढण्यासाठी देखील पोस्ट ऑफिसचे नियमही बदलले आहेत. एक, दोन आणि तीन वर्षांच्या FD मध्ये जमा केल्यापासून 6 महिन्यांच्या आत मुदतपूर्व पैसे काढता येत नाहीत. तुम्ही 6 महिन्यांनंतर एक वर्षाची एफडी काढल्यास, बचत खात्याप्रमाणेच व्याज दिले जाईल.

त्याच वेळी, दोन वर्षांची एफडी सहा महिन्यांनंतर काढल्यास, बचत खात्याच्या दराने दोन टक्के दंड भरावा लागेल. याशिवाय, तीन वर्षांची एफडी 6 महिन्यांनंतर काढली तर बचत खात्याच्या दराने दोन टक्के दंड भरावा लागेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts