Top 3 Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. शेअर मार्केटमधून नफा कमावण्यासाठी अनेक गुंतवणूकदार अधिक परतावा देणा-या स्टॉक कडे वळत असतात. दरम्यान आज आम्ही अशाच तीन स्टाॅकबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने गुंतवणूकदार रोज चांगला परतावा कमावत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पॉवर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 307.63 अंकांनी किंवा 0.47% घसरून 65,688.18 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 89.45 अंकांनी म्हणजेच 0.46% घसरून 19,543.10 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एशियन पेंट्सचा शेअर तीन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.
तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करायची असेल, तर आम्ही तुम्हाला त्या तीन शेअर्सबद्दल सांगत आहोत ज्यांनी शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये लक्षणीय तेजी नोंदवली आहे. चला तर मग त्या शेअर्सबद्दल जाणून घेऊया-
FDC Ltd
गुरुवारी, FDC Ltd च्या शेअरने सुमारे 9 टक्के वाढ नोंदवली आणि 407 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, FDC लिमिटेडचा निव्वळ नफा 57 टक्क्यांनी वाढून 110 कोटींवर पोहोचला आहे, तर परिचालन महसूल 8.4 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 536 कोटींवर पोहोचला आहे.
Sundram Fasteners Ltd
सुंदरम फास्टनर्स लिमिटेडच्या शेअरने गुरुवारी 5.55 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि ती 1,199 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. कंपनीने अलिकडच्या काळात कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही, त्यामुळे शेअरच्या किमतीतील वाढ ही केवळ बाजारातील ताकदीमुळे झाल्याचे समजते.
Varroc Engineering Ltd
Varroc Engineering चे शेअर्स गुरुवारी 5% पेक्षा जास्त वाढले आणि 385 च्या पातळीवर पोहोचले. या कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे, तिच्या शेअरमध्ये तेजीची नोंद होत आहे. व्हेरॉक इंजिनिअरिंगचा निव्वळ नफा 55 कोटी होता तर त्याचा महसूल 10% वाढून 1792 कोटींवर पोहोचला आहे.