आर्थिक

Top 5 Govt Savings Schemes : आजच करा ‘या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक, परिपक्वतेवर मिळेल उत्तम परतावा

Top 5 Govt Savings Schemes : सध्या वेगवेगळ्या गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे आता तुम्हाला सर्व सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून कर वाचवता येतो. एवढेच नाही तर अनेक योजनांमध्ये परतावा देखील चांगला मिळत आहे.

सध्या अशा काही सरकारी योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून परिपक्वतेवर उत्तम परतावा मिळवू शकता. यात तुम्हाला कर सवलत देखील मिळत आहे. शिवाय कोणतीही जोखीम गुंतवणूकदाराला घ्यावी लागत नाही. पहा सविस्तर.

राष्ट्रीय बचत योजना

व्याज दर: 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 – 7.4%
या योजनेमध्ये 1000 च्या पटीत गुंतवणूक करता येते. तुम्ही यात कमाल 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवू शकता.
खाते 5 वर्षात परिपक्व होते आणि गुंतवणूकदाराला एक वर्षानंतर खाते बंद करता येते.
गुंतवणूकदारांना एकापेक्षा जास्त खाती चालू करता येते.

सुकन्या समृद्धी खाते

व्याज दर: 8%
या योजनेअंतर्गत, एका आर्थिक वर्षात कमीत कमी ठेव रक्कम 250 रुपये आणि जास्तीत जास्त ठेव रक्कम 1.5 लाख रुपये इतकी आहे.
10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
एका खातेदाराच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.चालू करता येते.
हे खाते २१ वर्षांत परिपक्व होते.
१८ वर्षानंतर मुलीचे लग्न झाल्यानंतर, खाते मुदतीपूर्वी बंद करता येते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना

व्याज दर: 7.1%
या योजनेत कमीत कमी रक्कम रुपये 500 आणि कमाल 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते.
या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंस तुम्ही ७व्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी पैसे काढता येतात.
ज्या वर्षात खाते चालू आहे त्या वर्षाच्या अखेरीपासून 15 आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते परिपक्व होते.
आयटी कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत ठेव रक्कम वजावट अंतर्गत येते.

किसान विकास पत्र

व्याज दर: 7.5%
या योजनेत 1000 रुपये आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते.
10 वर्षांनंतर एकल खाते चालू करता येते.
या योजनेत मुदतपूर्तीनंतर पैसे डबल होतात.
खाते 115 महिन्यांत परिपक्व होते.

पोस्ट ऑफिस बचत खाते

व्याज दर: 4%
या योजनेत तुम्हाला किमान 500 रुपये जमा करू शकता, जास्तीत जास्त ठेव रकमेवर मर्यादा नाही.
योजनेअंतर्गत एकल आणि संयुक्त खाती चालू करता येते.
वयाच्या 10 वर्षानंतर या योजनेअंतर्गत खाते चालू करता येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts