Top 5 Share : गेल्या एक महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. पण असे असूनही तुम्ही या 5 शेअर्सवर नजर टाकली तर त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आज आम्ही अशा टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी एका महिन्यातच गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. चला अशा या उत्कृष्ट स्टॉक्सबद्दल जाणून घेऊया.
Innovative Ideals and Servicesच्या शेअरने एका महिन्यात खूप चांगला परतावा दिला आहे. एका महिन्यापूर्वी हा शेअर 2.63 रुपयांच्या आसपास होता. आणि आता हा शेअर 6.41 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 143.73 टक्के परतावा दिला आहे.
Rathi Steel & Powerच्या शेअरनेही एका महिन्यात खूप बंपर परतावा दिला आहे. महिनाभरापूर्वी हा शेअर ४.८६ रुपये इतका होता. आणि आता हा शेअर 11.54 रुपयांवर पोहोचला आहे. अशाप्रकारे या शेअरने केवळ एका महिन्यातच सुमारे 137.45 टक्के परतावा दिला आहे.
Jai Balaji Industriesच्या स्टॉकनेही एका महिन्यात चांगला परतावा दिला आहे. एका महिन्यापूर्वी हा शेअर 95.17 रुपयांच्या आसपास होता. त्याच वेळी, या शेअरचा दर आता 218.30 रुपये आहे. या शेअरने केवळ एका महिन्यात सुमारे 129.38 टक्के परतावा दिला आहे.
Kiran Syntex Ltdच्या शेअरनेही गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. तुमच्या माहितीसाठी महिनाभरापूर्वी हा शेअर ५.८४ रुपये इतका होता. आणि आता या शेअरचा दर 12.88 रुपये आहे. अशाप्रकारे, या स्टॉकने केवळ एका महिन्यातच सुमारे 120.55 टक्के परतावा दिला आहे.
Sahara Housing Financeच्या शेअरनेही एका महिन्यात उत्तम परतावा दिला आहे. महिनाभरापूर्वी हा शेअर ४९.९१ रुपयांवर व्यवहार करत होता. आणि आता या शेअरचा दर 109.60 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने केवळ एका महिन्यातच सुमारे 119.60 टक्के परतावा दिला आहे.