Unity Bank : सणासुदीच्या काळात युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. वाढीव व्याजदर 9 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. आता बँक तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा देत आहे.
बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर हे व्याजदर वाढवले आहेत. युनिटी बँकेने ७०१ दिवसांच्या मुदतीसह एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ताज्या वाढीनंतर ही बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ९.४५ टक्के दराने व्याज देत आहे. याच कालावधीत बँक सर्वसामान्य ग्राहकांना ८.९५ टक्के वार्षिक व्याज देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन व्याजदर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या मुदतीसह FD वर ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना वार्षिक सर्वाधिक 9.50 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ही बँक सामान्य ग्राहकांना त्याच कालावधीत 9 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय ही बँक 181-201 दिवस आणि 501 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के वार्षिक व्याज आणि सामान्य ग्राहकांना 8.75 टक्के व्याज देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक आता आपल्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर वार्षिक 4.5 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ते ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना 4.5 टक्के ते 9.5 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे.
बँक ऑफ बडोदाने देखील FD वर व्याजदर वाढवले
आपल्या ग्राहकांना चांगली बातमी देत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने देखील FD वर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व्याजदरात 50 bps पर्यंत वाढ केली आहे. हा नवा व्याजदर 9 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहेत. येस बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इंडसइंड बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेनेही त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत.