आर्थिक

UPI payment Tips : UPI पेमेंटमध्ये पैसे अडकण्याचे झंझट होईल दूर! फक्त वापरा या सोप्या टिप्स

UPI payment Tips : देशभरात आजकाल अनेकजण ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहार होत असल्याने नागरिकांना तासंतास बँकेच्या रांगेत उभा राहून पैसे काढण्याची गरज नाही. कुठेही सहज ऑनलाईन व्यवहार करणे शक्य झाले आहे.

मात्र अनेकदा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करायला गेल्यानंतर खात्यातून पैसे कापले जातात मात्र समोरच्या व्यक्तीला ते पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेकजण पैसे कापल्याने टेन्शन घेत असतात. मात्र तुमचे हे पैसे कुठेही जात नाहीत तुम्ही ते काही टिप्स वापरून सहज परत मिळवू शकता.

आजकाल बाजारात तुम्ही पेटीएम वर पैसे मिळाल्याचे मेसेज ऐकत असाल. मात्र अनेकदा यावर तुम्ही पैसे पाठवूनही पैसे जात नाहीत आणि काही लोक त्या दुकानदारही भांडताना दिसतात. तुमचे पैसे अडकले तर काय करावे चला जाणून घेऊया…

UPI मर्यादा तपासा

ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा पैसे अडकतात. मात्र ऑनलाईन पेमेंट करत असताना तुम्ही तुमची पैसे पाठवण्याची मर्यादा किती आहे हे तपासणे गरजेचे आहे. कारण NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, UPI मधून एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पैसे ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे देखील पैसे अडकू शकतात. त्यामुळे तुम्हाला बँकेकडून पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा किती देण्यात आली आहे हे पाहणे आवश्यक आहे.

एकाधिक खाती लिंक करा

तुमच्याकडे जर दोन बँक खाती असतील तर ती UPI अॅपशी लिंक करा. कारण तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. कारण जर तुमचे पेमेंट एका खात्यावरून झाले नाही तर दुसऱ्या खात्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. तसेच काही वेळा बँकेचा देखील सर्व्हरही डाऊन असतो त्यामुळे तुम्ही दुसऱ्या खात्यावरून पैसे पाठवू शकता.

डेटा सुरळीत चालण्यास अडचणी

काही वेळा तुम्ही पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असता मात्र तुमचे पैसे काही इंटरनेट समस्यांमुळे जात नाहीत. त्यामुळे पैसे पाठवण्याअगोदर तुम्ही मोबाईलला सिग्नल आहे की नाही हे तपासा. जर तुमच्या मोबाईलला सिग्नल नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts