आर्थिक

Investment In Gold: सोन्यात गुंतवणूक करून लाखो कमवायचे असतील तर ‘हे’ पर्याय ठरतील फायद्याचे! व्हाल मालामाल

Investment In Gold:- गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना तसेच सरकारच्या देखील अनेक योजना आहेत. याशिवाय ज्यांना जोखीम पत्करण्याची इच्छा असते असे गुंतवणूकदार शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंड एसआयपी सारख्या पर्यायांचा देखील गुंतवणुकी करिता निवड करतात.

परंतु जर आपण एकंदरीत भारतीयांचा विचार केला तर भारतातील गुंतवणूकदारांमध्ये फार पूर्वीपासून सोने खरेदी म्हणजे सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड मोठा आहे. सोन्याची प्रत्यक्ष खरेदी करून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. परंतु या व्यतिरिक्त सोन्यात गुंतवणुकीचे दुसरे पर्याय देखील उपलब्ध आहेत व या माध्यमातून देखील केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा म्हणजे चांगला पैसा मिळवता येऊ शकतो.

तसेच तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्या अनुषंगाने या लेखात आपण सोन्यात गुंतवणूक करण्याचे कोणकोणते चांगले पर्याय आहेत? त्यामधून तुम्हाला लाखोत परतावा मिळू शकतो. अशा पर्यायांची माहिती घेऊ.

 सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायद्याचे पर्याय

1- फिजिकल गोल्ड म्हणजेच सोन्याची प्रत्यक्ष खरेदी या पर्यायामध्ये आपण सोनाराकडून प्रत्यक्षपणे सोन्याची खरेदी करतो व हा पर्याय फार पूर्वीपासून भारतामध्ये वापरला जातो व हा सर्वात सोपा मार्ग देखील मानला जातो. या पर्यायांमध्ये ज्वेलर्स कडून सोन्याचे दाग दागिने खरेदी करतो किंवा सोन्याची बिस्किटे किंवा नाणे देखील खरेदी करू शकतो.

कालांतराने भविष्यकाळात सोन्याची किंमत वाढल्यावर घेतलेल्या सोन्याची विक्री करून त्या माध्यमातून आपण नफा मिळवू शकतो.

परंतु या पर्यायांमध्ये सोन्याचे जेव्हा दागिने बनवतो तेव्हा त्यावर ते दागिने बनवण्यासाठी चा लागणारा चार्ज म्हणजेच मेकिंग चार्ज व जीएसटी लागतो व त्याचा खर्च आपल्याला वेगळा करावा लागतो. परंतु या पद्धतीमध्ये जर तुम्ही सोन्याचे नाणे खरेदी कराल तर तुम्हाला तुमच्या सोन्याच्या भावानुसारच पैसे द्यावे लागतात.

2- सॉवरीन गोल्ड बॉण्ड्स हा देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित मार्ग असून सरकारकडून हे बॉण्ड प्रत्येक वर्षी एका ठराविक कालावधीत जाहीर केले जातात. जर तुम्हाला या पर्यायांमध्ये जर सोन्याची गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

या प्रकारामध्ये तुम्हाला तुम्ही जितके ग्राम सोने खरेदी कराल तितक्या सोन्यावर तुम्हाला व्याज देखील मिळते. साधारणपणे मिळणाऱ्या व्याजाचा दर पाहिला तर तो 2.50 टक्क्यांपर्यंत असतो. परंतु यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे असते.

3- गोल्ड ईटीएफ या पर्यायांमध्ये तुम्ही शेअर्स ज्याप्रमाणे खरेदी करतात त्याप्रमाणे सोने खरेदी आणि त्याची विक्री करू शकतात. जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुम्ही एक प्रकारे सोन्याची खरेदी करत असतात. या पर्यायाच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे असते.

ज्याप्रकारे आपण शेअर बाजारात गुंतवणूक करतो अगदी त्याच प्रकारची गुंतवणूक गोल्ड एटीएफमध्ये देखील करावी लागते व ही प्रक्रिया अगदी सारखी आहे. या पर्यायांमध्ये तुम्ही सोन्याचे युनिट्स तुमच्या सोयीनुसार खरेदी करू शकतात.

4- डिजिटल गोल्ड डिजिटल गोल्ड या पर्यायांमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून फोन पे, अमेझॉन पे सारखे पेमेंट करणाऱ्या एप्लीकेशनच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड ची खरेदी करू शकतात. या पर्यायाच्या माध्यमातून सोने खरेदी करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला ते सांभाळण्याची कुठल्याही प्रकारची चिंता नसते किंवा चोरी होईल याची देखील भीती नसते.

5- गोल्ड म्युच्युअल फंड सध्या सोन्यात गुंतवणुकीचा हा पर्याय खूप प्रसिद्ध होत असून गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन इंडेड इन्वेस्टमेंट प्रॉडक्ट आहे. या पर्यायाचा वापर करून तुम्ही अगदी 1000 रुपयापासून सोन्यात गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts