आर्थिक

Gold Loan : गोल्ड लोन संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी, रिझर्व्ह बँकेने घेतलाय मोठा निर्णय

Gold Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वित्त धोरण आढावा बैठकीनंतर गोल्ड लोनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने गोल्ड लोनची मर्यादा 2 लाखरुपयांवरून 4 लाख रुपये केली आहे. मात्र, हे गोल्ड लोन बुलेट रिपेमेंटच्या पर्यायावरच दिले जाऊ शकते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले की, निवडक नागरी सहकारी बँका आता आपल्या ग्राहकांना चार लाख रुपयांपर्यंत गोल्ड लोन देऊ शकतात. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ज्या नागरी सहकारी बँकांनी 31 मार्च 2023 पर्यंत प्राधान्य क्षेत्र कर्जाचे (पीएसएल) निकष पूर्ण केले आहेत,

त्यांना आता अधिक सोने कर्ज वाटप करता येणार आहे. या विषयाची रूपरेषा RBI च्या निवेदनात सादर करण्यात आली आहे. त्यानुसार, ही सूट सुरू ठेवण्यासाठी पात्र नागरी सहकारी बँकांना भविष्यात पीएसएलचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागेल.

गोल्ड लोन बुलेट रिपेमेंट विकल्प म्हणजे काय?

गोल्ड लोन बुलेट रिपेमेंट पर्यायांतर्गत कर्जदारांना कर्जाची मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम आणि व्याजाची रक्कम भरावी लागते. मासिक ईएमआय वेळापत्रक असलेल्या पारंपारिक कर्जाच्या पर्यायाच्या उलट हा पर्याय आहे. या पर्यायाने कर्जाच्या कालावधीत दरमहा पैसे भरण्याची आवश्यकता राहत नाही.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की गोल्ड लोनवरील व्याज संपूर्ण कालावधीत मासिक पद्धतीने गणले जाते आणि कर्जदाराने कर्जाच्या कालावधीच्या शेवटी एकूण मुद्दल आणि व्याज भरणे बंधनकारक आहे. तथापि, आरबीआयने म्हटले आहे की या विषयावर तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्रपणे जारी केली जातील.

* बँकांचे गोल्ड लोन व्याजदर

– HDFC गोल्ड लोनचे व्याजदर 11 टक्क्यांपासून सुरू होतात

– कॅनरा बँक गोल्ड लोनचे व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होतात

– मुथूट गोल्ड लोनचे व्याजदर 10.5 टक्क्यांपासून सुरू होतात

– SBI गोल्ड लोनचे व्याजदर 8.65 टक्क्यांपासून सुरू होतात

– कोटक महिंद्रा गोल्ड लोनचे व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होतात

– इंडसइंड बँक गोल्ड लोनचे व्याजदर 8.75 टक्क्यांपासून सुरू होतात

– मणप्पुरम गोल्ड लोनचे व्याजदर 9.90 टक्क्यांपासून सुरू होतात

– PNB गोल्ड लोनचे व्याजदर 8.10 टक्क्यांपासून सुरू होतात

– बँक ऑफ बडोदा गोल्ड लोनचे व्याजदर 9.15 टक्क्यांपासून सुरू होतात

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Gold Loan

Recent Posts