Personal Loan : इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज हे खूप महाग असते, याचे कारण म्हणजे हे असुरक्षित कर्ज आहे. म्हणूनच याचा व्याजदर इतर कर्ज पर्यायांपेक्षा जास्त असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहेत. जर तुम्हालाही आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही या बँकांकडून सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
पंजाब आणि सिंध बँक
ही बँक वैयक्तिक कर्जावर इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदर आकारत आहे. यामध्ये 10.15 टक्के ते 12.80 टक्के व्याज आकारले जात आहे. ही बँक वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी 60 महिन्यांपर्यंत वेळ देते.
बँक ऑफ महाराष्ट्र
ही बँक आपल्या ग्राहकांकडून वैयक्तिक कर्जावर १० टक्के किंवा त्याहून अधिक व्याज आकारत आहे. कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवर आधारित व्याजदर ठरवले जातात. कर्जाचा कालावधी 84 महिने आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांकडून 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के व्याज आकारते. हे कर्ज 84 महिन्यांत फेडता येते.
बँक ऑफ बडोदा
तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. ही बँक ग्राहकांना 5 लाख ते 20 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी 10.35 टक्के ते 17.50 टक्के दराने कर्ज देते. यासाठी 48 महिने ते 60 महिन्यांचा कालावधी आहे.
इंडसइंड बँक
परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये या बँकेचाही समावेश आहे. यामध्ये 3 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 32.02 टक्के व्याज आकारले जाते. त्याचा कालावधी 12 ते 60 महिन्यांच्या दरम्यान असू शकतो.