Marathi News : सुज्ञ लोक त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यातच निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करून ठेवत असतात. म्हणजेच एकदा का आपले वय ५८ च्या पुढे गेले की आपली काम करण्याची क्षमता कमीच होते. म्हणजेच आपण निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग आधीच करायला पाहिजे जेणे करून आपल्याला म्हतारपणात पैशांची अडचण येणार नाही.
अनेक लोक याकडे दुर्लक्ष देखील करतात. त्यामुळे त्यांचे नोकरी संपल्यानंतरचे अर्थात रिटायरमेंटनंतरचे आयुष्य कठीण जाते. निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखात जगण्यासाठी तुम्हाला विशेष वेगळे करण्याची गरज नाही. दररोजच्या नियोजनातच थोडासा बदल करून तुम्ही हे करू शकता.
यासाठी खूप मोठं प्लॅनिंग किंवा वेगवेगळ्या योजनेमध्ये पैसे गुंतवावे लागतील असे नाही. येथे आम्ही तुम्हाला केवळ तीन पर्याय सांगणार आहोत. त्यात एखाद्यात जरी तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक सुरु केली तरी तुम्ही रिटायरमेंट पर्यंत लाखो रुपये फंड स्वतःसाठी तयार करू
शकता. या तीन योजना म्हणजे व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड, पीपीएफ, इक्विटी लिंक्ड सेंविग्स स्कीम. चला या तिन्ही योजनांमधील रिटर्न व इतर गोष्टी जाणून घेऊयात –
* यातील पहिला पर्याय इक्विटी लिंक्ड सेंविग्स स्कीम
आपल्या देशात जवळपास 42 म्युच्युअल फंड कंपन्या टॅक्स सेव्हिंग स्कीम चालवतात. ही स्कीम आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. आयकर वाचवण्यासाठी, वन टाइम इन्वेस्टमेंट लिमिट मिनिमम 5,000 रुपये आहे आणि जर तुम्हाला दरमहा गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता.
यात किती गुंतवणूक करावी याला मात्र लिमिट नसल्याने तुम्ही भरपूर गुंतवणूक करू शकता. यात पैसे गुंतवल्यास 3 वर्षांसाठी लॉक-इन पिरियड आहे. त्या नंतर मात्र तुम्ही पैसे काढू शकता. आता जर आपण रिटर्न पाहिले तर गेल्या 10 वर्षांत ELSS म्युच्युअल फंड कॅटेगिरीने सुमारे 8.5 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
* दुसरा पर्याय आहे पब्लिक प्रोविडेंट फंड
ही स्कीम पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही तुम्हाला मिळेल. यात अवघ्या 500 रुपयांच्या गुंतवणुकीवर खाते उघडता येते. खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये जमा करू शकता. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. त्यानंतर तुम्ही 5 – 5 वर्षांसाठी ते वाढवू शकता.
यावर सध्या 7.1 टक्के व्याज मिळवू शकता. सरकारी निर्णयानुसार यात बदल होऊ शकतात. हे खाते 15 वर्षाच्या आत बंद केले जाऊ शकत नाही. तुम्ही 3 वर्षांनंतर या खात्यावर कर्ज घेऊ शकता. यामध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळतो.
* महत्वाचा तिसरा ऑप्शन – वॉलेंटरी प्रोविडेंट फंड :
आपण ईपीएफमध्ये साधारण मूळ वेतनाच्या केवळ 12 टक्के रक्कम गुंतवू शकतो. कारण त्याचे तेवढेच लिमिट आहे. परंतु जर तुम्ही वॉलेंटरी प्रोविडेंट फंड मध्ये गुंतवणूक एली तर यात कसलीही मर्यादा नाही. जर तुम्ही पगारातील जास्त रक्कम गुंतवण्याचा विचार केला तर वॉलेंटरी प्रोविडेंट फंड मध्ये गुंतवणूक करा.
व्हीपीएफमध्येही 8.1 टक्के व्याज दिले जात आहे. नोकरदार वर्ग यात खाते उघडू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या एचआरशी संपर्क साधावा लागेल आणि व्हीपीएफमध्ये पैसे गुंतवणुकीची मागणी तुम्हाला करावी लागेल.