आर्थिक

Cibil Score म्हणजे काय, कर्ज घेताना सिबिल स्कोअरची भूमिका काय असते? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Cibil Score : बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूप महत्व दिले जाते. सिबिल स्कोर हा एक प्रकारे तुमच्या बँकिंग इतिहासाची संपूर्ण माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा नेहमी ३०० ते ९०० च्या संख्येदरम्यान गणला जातो.

३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला Cibil Score असल्याचं दर्शवतो. Cibil Score वरून तुमची Banking Credit History चांगली आहे की नाही तुम्ही बँकेद्वारे किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही वेळेत जमा करतात की नाही हे Cibil Score वरून ठरते.

Cibil Score म्हणजे काय?

सिबील स्कोअर म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर भरू शकता की नाही याचं मोजमाप करण्याची स्केल म्हणजे सिबिल स्कोर होय. बँक किंवा वित्तीय संस्था या सिबिल स्कोअर पाहून तुमची कर्ज भरण्याची क्षमता आहे की नाही हे ठरवतात. याच Cibil Score च्या आधारे तुम्हाला तुमची कर्ज राशी निश्चित करून कर्ज दिले जाते.

Cibil Score का महत्वाचा आहे?

Cibil Score वरुन तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री समजते. तूम्ही जेव्हा एखाद्या बँक शाखेत किंवा वित्तीय संस्थेत कर्जासाठी अर्ज करतात त्यावेळी त्या बँक शाखा किंवा वित्तीय संस्था अर्ज स्वीकारण्यापूर्वी आधी तुमचा सिबिल स्कोर तपासतात आणि त्यावरुन तुमची कर्ज फेड संदर्भातील वागणूक समजते की तूम्ही घेतलेले कर्ज वेळेवर जमा करतात की नाही.

क्रेडिट स्कोअर हा साधारणतः कर्ज, बिल पेमेंट, ब्लूप्रिंट साठी तपासला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७०० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर बँक आणि वित्तीय संस्थांच्या नजरेत हे उत्तम मानले जाते.

Cibil Score किती असला पाहिजे?

सिबील स्कोअर हा कमी असल्या कारणामुळे अनेक जणांना बँकेमार्फत कर्ज मिळत नाही त्यामुळे नेहमी Cibil Score ३०० ते ९०० स्कोअर च्या आसपास असणे आवश्यक आहे. जर ३०० पेक्षा कमी तुमचा स्कोअर असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे थोडे अवघड होऊन जाते. यामुळे किमान ४०० पेक्षा जास्त Score ठेवणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

सिबील स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी:

चला तर जाणून घेऊयात की Cibil Score सुधारण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत-

Cibil Score तपासणे : सर्वप्रथम हे जाणून घ्या की आपला सिबील स्कोअर किती आहे आणि सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला आवश्यक असलेली कर्ज राशी मंजुर होण्यास मोठी मदत होते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट स्थितीबद्दल संपूर्ण माहिती दर्शवतो. तुम्ही वेळोवेळी तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता.

वेळेवर कर्ज जमा करणे : जर तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा आहे तर चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी तुम्हाला कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते वेळोवेळी जमा करावी लागतील कोणताही हफ्ता चुकता कामा नये. जर तुम्ही घेतलेले कर्ज उशीरा जमा करत असाल तर हे टाळा. उशीरा हफ्ता जमा केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर हा कमी कमी होत जातो.

आपल्या क्रेडिट स्कोअरचे निरीक्षण करा : जर तुम्हाला क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहायचे असल्यास यासाठी तुम्हाला नियमित क्रेडिट स्कोअरचे निरीक्षण केले पाहिजे. जर तुम्हाला रिपोर्टमध्ये काही चूक आढळल्यास तर त्या चुकीचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअर वरती फारसा परिणाम होणार नाही.

क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर : जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० किंवा त्यावरून अधिक ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा आणि आपल्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ नये याची खात्री करुन घ्यावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: CIBIL Score

Recent Posts