FD Interest Rates : बँकांमध्ये एफडी करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सुरक्षिततेसोबतच येथे परतावा देखील जास्त दिला जात आहे. या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात ठराविक वेळेसाठी पैसे गुंतवू शकता. आज आम्ही तुम्हाला देशातील मोठ्या बँकांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल सांगत आहोत. बहुतेक बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD ऑफर करतात. बँका या एफडीवर 3 टक्के ते 7.50 टक्के पर्यंत व्याज देतात.
एचडीएफसी बँक एफडी व्याजदर
एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
ICICI बँक FD व्याजदर
एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 6.00 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
येस बँक एफडी व्याजदर
येस बँक 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 3.25 टक्के ते 7.25 टक्के दरम्यान व्याज देत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक :-
SBI चे FD व्याजदर
SBI 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 5.75 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
PNB FD व्याजदर
PNB 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 7 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
कॅनरा बँक एफडी व्याजदर
कॅनरा 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
स्मॉल फायनान्स बँक :-
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
Unity SFB 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 4.50 टक्के ते 7.85 टक्के दरम्यान व्याजदर देत आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जना SFB 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 टक्के ते 8.50 टक्के पर्यंत व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 4 टक्के ते 6.85 टक्के पर्यंत व्याज देत आहे.