Post Office Saving Schemes : ज्या लोकांना सुरक्षित आणि हमी परताव्यासह गुंतवणूक आवडते ते बहुतेक बँकांमध्ये गुंतवणूक करतात. पण बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात. या योजनांमध्ये बँकेपेक्षा चांगले व्याज दिले जातात. सरकार प्रत्येक तिमाहीत पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये सुधारणा करते.
तथापि, आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, म्हणजेच या तिमाहीतही विद्यमान व्याजदर लागू राहतील. येत्या महिन्याभरात तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कोणत्या स्कीमवर किती व्याज मिळणार आहे पाहूया…
पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर :-
पोस्ट ऑफिस बचत खाते- 4 टक्के
1 वर्षाची मुदत ठेव- 6.9 टक्के
2 वर्षाची मुदत ठेव- 7.0 टक्के
३ वर्षाची मुदत ठेव- 7.1 टक्के
5 वर्षांची मुदत ठेव- 7.5 टक्के
5-वर्ष आवर्ती ठेव खाते- 6.7 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना- 8.2 टक्के
मासिक उत्पन्न योजना- 7.4 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी खाते- 8.2 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- 7.7 टक्के
किसान विकास पत्र- 7.5 टक्के
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- 7.5 टक्के
तुम्हाला यापैकी काही योजनांचे पर्याय बँकेत देखील मिळतील, तर काही योजना फक्त पोस्ट ऑफिसमध्ये उघडल्या जाऊ शकतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, मंथली इनकम स्कीम या अशा योजना आहेत ज्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात.
तर एमआयएस योजना ही दरमहा नियमित उत्पन्न देणारी योजना आहे. या योजनेत, एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही रक्कम ५ वर्षांसाठी ठेवली जाते. यावर ७.४ टक्के दराने पैसे दिले जातात.