Ladali Behena Yojana : सरकारकडून देशभरात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. आता मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने महिलांची विशेष काळजी घेतली आहे. महिलांना आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी एक योजना सादर केली असून, जाणून घ्या या योजनेबद्दल.
सरकारने जाहीर केलेल्या या जाहीरनाम्यात जेपी नड्डा लाडली बेहना योजनेच्या लाभांसह 1 लाख महिलांना कायमस्वरूपी घराची सुविधा देणार असल्याचे सांगितले असून, यासोबतच ग्रामीण महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार नेहमी नवीन योजना आणत असते. खेड्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
महिलांना कौशल्य प्रशिक्षण मिळेल
दरम्यान, महिलांबाबत बोलताना भाजप सरकारने जाहीरनाम्यात 15 लाख ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे करोडपती बनवणार असल्याचे म्हटले आहे. लाडली बेहना योजनेअंतर्गत, राज्य सरकार मध्य प्रदेशातील महिलांना दरवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे.
दरम्यान, या योजनेचा फायदा हा सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विधवा महिला होणार असून, स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरते.