Yes Bank Personal Loan:- बऱ्याचदा दैनंदिन जीवनामध्ये पैशांच्या बाबतीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज पूर्ण करण्याकरिता एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपात पैसे घेतले जातात. जेव्हा कुठल्याही बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून आपण कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा संबंधित वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज मागणाऱ्यांची उत्पन्नाची स्थिती तसेच त्याचा क्रेडिट इतिहास,
त्याच्या रोजगाराची परिस्थिती आणि तो परतफेड करू शकेल का याबाबतची त्याची क्षमता इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. यामध्ये जर आपण पर्सनल लोनचा विचार केला तर साधारणपणे काही प्रवासाच्या योजना, लग्नकार्य, वैद्यकीय आणीबाणी तसेच घराचे नूतनीकरण या व इतर गरजांकरिता पर्सनल लोनचा वापर प्रामुख्याने बरेच जण करतात.
यामध्ये विविध बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या त्यांच्या नियमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वैयक्तिक कर्ज कर्जदाराला देत असतात. या बँकांच्या मध्ये जर तुम्ही येस बँकेचा विचार केला तर तुम्ही येस बँकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण न देता चाळीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
येस बँक झटक्यात देईल तुम्हाला 40 लाखापर्यंत कर्ज
येस बँकेच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही प्रकारचे तारण न देता चाळीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला प्री पेमेंटचा पर्याय देण्यात आला असून त्यासोबतच तुम्हाला कर्ज ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन देखील दिला जातो. याकरिता तुम्ही पात्र आहात की नाही याची तपासणी अगदी काही सेकंदामध्ये करू शकतात.
काही आवश्यक प्रक्रिया पार केल्यानंतर कर्ज मंजूर झाले की ताबडतोब कर्जाची मंजूर रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते. एवढेच नाही तर तुम्ही नेट बँकिंग द्वारे देखील बँकिंग सर्विसेस च्या माध्यमातून एप्लीकेशन करून तुमची लोनची स्टेटस किंवा स्थिती तपासू शकतात.
येस बँकेच्या पर्सनल लोन करिता तुम्हाला दोन टक्के एवढे प्रोसेसिंग फीज बँकेच्या माध्यमातून आकारले जाते व व्याजदर पाहिला तर तो 10.99 टक्क्याच्या पुढे सुरू होतो. या पर्सनल लोन वर असलेल्या व्याजदराचे स्वरूप हे तुमच्या क्रेडिट इतिहास अर्थात क्रेडिट स्कोर वर अवलंबून असते. साधारणपणे या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा साठ महिन्याचा असतो.
पर्सनल लोन मिळवण्यासाठीची पात्रता
तुम्हाला देखील येस बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदाराचे वय हे किमान 21 आणि कमाल 60 वर्ष असावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे गरजेचे आहे व ते अनिवार्य देखील आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला येस बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे येस बँकेमध्ये बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
येस बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी असा करावा अर्ज
1- तुम्हाला जर ताबडतोब पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्याकरिता येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
2- या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या होम पेजवर मेनू असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केले की तुम्हाला पर्सनल लोन बँकिंग इन डिव्हिज्युअल लोन्स असा पर्याय त्या ठिकाणी दिसतो.
3- या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल व जेव्हा तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला येस बँक पर्सनल लोन संबंधित विविध माहिती त्या ठिकाणी मिळेल व ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
4- त्यानंतर तुम्हाला येस बँक पर्सनल लोन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल व या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्यासंबंधीचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
5- हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरावा लागेल व विचारलेली सगळी आवश्यक कागदपत्रे आवश्यक असलेल्या फॉर्मेट नुसार अपलोड करणे गरजेचे राहिलं.
6- कागदपत्र वगैरे अपलोड केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे व त्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होते.
7- तुमची सगळी पात्रता आणि कागदपत्रे व इतर बाबी व्यवस्थित असतील तर तुम्हाला तुमचे कर्ज काही दिवसातच मिळते.