आर्थिक

कमी पैशात करता येईल जास्त कमाई! ‘हा’ व्यवसाय करेल तुम्हाला मालामाल; वाचा व्यवसायाचे प्लॅनिंग

Low Investment Business Idea:- तुमचे शिक्षण झाले आहे,परंतु नोकरीच मिळत नाही व नोकरी न मिळाल्यामुळे तुम्ही हताश झाले आहात व आता काय करावे हा प्रश्न तुमच्यासमोर उभा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखादया व्यवसायाला सुरुवात करणे खूप फायद्याचे ठरू शकते.

व्यवसाय उभारण्यासाठी देखील पैसा लागतो हे जरी खरे असले, तरी देखील असे अनेक व्यवसाय आहेत की तुम्ही अगदी कमी पैशात सुरू करून त्यातून लाखोत कमाई करू शकतात.

फक्त अशा व्यवसायांची योग्य माहिती घेऊन व्यवसायाला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. कमी पैशात सुरू होणारे जर आपण व्यवसाय पाहिले तर यामध्ये खूप मोठी यादी तयार होईल इतके व्यवसाय आहेत. परंतु यामध्ये चांगली मागणी असणारा आणि कमी पैशात सुरू करता येईल अशा व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते.

त्यामुळे तुम्हाला देखील जर कमीत कमी पैशांमध्ये एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकरिता ट्रान्सपोर्टचा व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर ट्रान्सपोर्ट व्यवसायाची मागणी सातत्याने वाढताना दिसून येत आहे व हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून देखील सुरू करू शकतात व जास्त नफा मिळवू शकतात.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हणजेच वाहतूक सेवा हे आपल्याला माहिती आहे व यामध्ये अनेक प्रकार येतात. परंतु तुम्हाला जर कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही लोकांसाठी असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे.

मालवाहतूक व्यवसायापेक्षा जर तुम्ही प्रवासी वाहतूक असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला हा व्यवसाय कमी पैशात सुरू करता येईल.आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे व त्यामुळे या व्यवसायात चांगली संधी आहे.

कशा पद्धतीने करावी व्यवसायाला सुरुवात?
तुमच्याकडे जर एखादी चार चाकी असेल तर तुम्ही ती ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवसायासाठी वापरू शकतात. नाहीतर तुम्ही एखादी नवीन किंवा चांगल्या कंडीशन असलेली जुनी कार खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकतात.

ही कार तुम्ही स्वतः चालवू शकतात किंवा एखाद्या कंपनीला ट्रान्सपोर्ट सेवेसाठी देऊन त्यातून चांगली कमाई करू शकतात व हळूहळू हा व्यवसाय वाढवत जाऊन गाड्यांची संख्या वाढवू शकतात.

सध्या प्रवासी वाहतूक या व्यवसायामध्ये मागणी जास्त आहे व त्यामुळे तोटा होण्याची शक्यता फारच कमी आहे. कालांतराने तुम्ही योग्य नियोजन करून गाड्यांची संख्या वाढवू शकतात व स्वतःची छोटेखानी अशी ट्रान्सपोर्टेशन एजन्सी सुरू करू शकतात.

भाड्याने कार घेऊन करू शकता व्यवसायाला सुरुवात
समजा तुमच्याकडे भांडवल खूपच कमी असेल तर तुम्ही दोन ते तीन गाड्या भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही एखादे पर्यटन स्थळी किंवा शहरांमध्ये टॅक्सी सेवा सुरू केली तर चांगली कमाई या माध्यमातून तुम्हाला करता येऊ शकते.

फक्त भाडेतत्त्वावर गाडी घेताना तिची व्यवस्थित माहिती आणि कागदपत्र तपासून घेणे खूप गरजेचे असते. अशा पद्धतीने हळूहळू भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्यातून तुम्ही पैसा कमावून स्वतःच्या गाड्या कालांतराने खरेदी करून हा व्यवसाय वाढवू शकतात. इतकेच नाही तर तुम्हाला कर्ज देखील यामध्ये मंजूर होऊ शकते.

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत सरकारने मुद्रा योजना सुरू केली आहे व स्वतःचे व्यवसाय सुरू इच्छिणाऱ्यां करिता कमी व्याजदरामध्ये या योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्वतःचे वाहन खरेदी करण्यासाठी या योजनेचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

यासोबत करू शकतात पॅकर्स अँड मूव्हर्स हा व्यवसाय
पॅकर्स अँड मुव्हर्स व्यवसाय देखील ट्रान्सपोर्टेशन व्यवसायाचा एक प्रकार असून ट्रान्सपोर्टेशन व्यवसायासोबत तुम्ही हा व्यवसाय करून जास्तीचा नफा मिळवू शकतात.

आपल्याला माहित आहे की मोठ्या शहरांमध्ये अनेक जणांना काही महिन्यांनी किंवा प्रत्येक वर्षी राहत घर बदलावं लागतं व अशावेळी घर बदलली तर एका घरातील सामान दुसऱ्या घरात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागतो. ही संधी ओळखून तुम्ही ट्रक किंवा टेम्पो किंवा लॉरी अशा मोठ्या गाड्यांची खरेदी करून अशा पद्धतीने सेवा देऊ शकतात.

मोठ्या शहरांमध्ये या प्रकारच्या सेवेला खूप मोठी मागणी आहे व यातून चांगली कमाई देखील होते. तुमच्याकडे जर ट्रक किंवा टेम्पोसारखं मोठं वाहन नसेल तर तुम्ही सुरुवातीला वाहन भाड्याने घेऊन काही मजूर हाताशी घेऊन शिफ्टिंगचा हा व्यवसाय करू शकतात. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रातील हे दोन्ही व्यवसाय तुम्ही कमी खर्चात सुरू करून जास्तीचा फायदा मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts