आर्थिक

सरकारकडून 3.75 लाख रुपये अनुदान घ्या आणि तुमच्या गावात सुरू करा ‘हा’ व्यवसाय! महिन्याला कराल 20 हजार रुपये कमाई

शेती करत असताना शेतीच्या संबंधित असलेले अनेक व्यवसाय आपल्याला करता येतात व ते अगदी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी राहून करणे शक्य आहे. ज्याप्रकारे शेती प्रक्रिया उद्योग हे शेतीवर आधारित असतात अगदी त्याचप्रमाणे शेतीशी निगडित असलेले अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला करता येतात.

तसेच असे व्यवसाय उभारण्याकरिता सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यात येते. आता शेती म्हटले म्हणजे पिकांपासून अधिक उत्पादनाकरिता रासायनिक खतांचा वापर करणे क्रमप्राप्त असते. परंतु हा रासायनिक खतांचा वापर जर माती परीक्षण करून केला तर आपल्याला मातीला गरज असलेल्या पोषक घटकांच्या दृष्टिकोनातून रासायनिक खते देण्याचे नियोजन करता येते

व खर्चात देखील बचत होते व उत्पादन वाढते. या दृष्टिकोनातून माती परीक्षणाला खूप महत्त्व आहे. याच माती परीक्षणाशी निगडित असलेला व्यवसाय म्हणजेच माती परीक्षण केंद्र तुमच्या गावात उभारून तुम्ही चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवू शकतात.

 माती परीक्षण केंद्र सुरू करायचे असेल तर काय करावे?

माती परीक्षण केंद्रे मोठ्या प्रमाणावर सुरू व्हावीत व या केंद्रांना प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पंचायत स्तरावर माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी सरकार अनुदान स्वरूपात मदत करते.

माती परीक्षण केंद्रामध्ये आजूबाजूच्या गावाच्या व परिसरातील शेतीतील मातीची चाचणी केली जाते. या प्रकारचे माती परीक्षण केंद्र दोन प्रकारचे असतात व यातील पहिला म्हणजेच स्थावर माती परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच तुम्ही एखादे दुकान भाड्याने घेऊन माती परीक्षण केंद्र सुरू करू शकतात.

दुसरा प्रकार म्हणजे मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा हे होय. या प्रकारअंतर्गत तुम्ही एखादे वाहन खरेदी करून या वाहनांमध्ये माती परीक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेली उपकरणे ठेवून गावोगावी जाऊन माती परीक्षण करून चांगला नफा मिळवू शकता.मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या माध्यमातून 18 ते 40 वर्षे वयाच्या व्यक्तीला मिनी माती परीक्षण केंद्र उघडता येते.

याकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व याशिवाय संबंधित व्यक्तीला कृषी चिकित्सालय आणि शेती विषयी चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी हा शेतकरी कुटुंबातील असणे गरजेचे आहे. तुम्हाला देखील मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या अंतर्गत माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी उपसंचालक किंवा सहसंचालकांना भेटणे गरजेचे आहे.

 या योजनेअंतर्गत माती परीक्षण उघडल्यास मिळते 75 टक्के अनुदान

तुम्हाला जर पंचायत स्तरावरील माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर याकरिता पाच लाख रुपयांची गरज तुम्हाला असते. परंतु मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्ही माती परीक्षण केंद्र सुरू केले तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान म्हणजेच पाच लाखावर तुम्हाला सरकारी अनुदान म्हणून तीन लाख 75 हजार रुपयांचा फायदा मिळतो. म्हणजे तुम्ही अगदी एक लाख 25 हजारमध्ये माती परीक्षण केंद्र सुरू करू शकता.

 महिन्याला किती करू शकतात कमाई?

तुमच्या गावात बसून माती परीक्षण व्यवसाय करू शकतात. शेतकऱ्यांना माती परीक्षण करायचे असेल ते तुमच्याकडे शेतातील माती आणून देतील व तुम्हाला परीक्षण केंद्रावर त्या मातीची तपासणी करावी लागेल. शेतकरी तुम्हाला नमुन्या करिता तीनशे रुपये देईल. या माध्यमातून तुम्ही सहजपणे महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपयांची कमाई करू शकतात.

 माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी कुठे कराल संपर्क?

तुम्हाला देखील माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर तुम्ही soilhealth.dac.gov.in या वेबसाईटवर अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही 1800-180-1551 या किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts