साध्याचा जमाना हा ऑनलाईन जमाना आहे. सध्या तुम्हाला कसलेही व्यवहार करायचे असतील तर तुम्ही ते डिजिटल पेमेंटमध्येच करता. अगदी मोठे व्यवहार देखील आता ऑनलाईन केले जात आहेत. यासाठी सध्या Google Pay सारखे अँप फेमस होत चालले आहेत. याचा सर्रास वापर केला जातो.
UPI पेमेंट अॅपने, ऑनलाइन व्यवहारांची प्रक्रिया सुलभ झाली आहे. परंतु यात अडचण कधी येते तर ट्रॅन्जेक्शन हिस्ट्री डिलीट करताना. असे काही व्यवहार असतात की जे आपल्याला लपवायचे असतात. परंतु ते डिलीट होत नाहीत. तसा ऑप्शन तेथे दिसत नाही. परंतु आता तुम्हाला ते तुम्हाला अनावश्यक वाटणारे ट्रँजॅक्शन हिस्ट्री आता तुम्ही डिलीट करू शकता. चला जाणून घेऊयात त्याबद्दल
अशा पद्धतीने करा ट्रँजॅक्शन हिस्ट्री डिलीट
Google Pay ओपन करा. वरच्या बाजूला प्रोफाइल पिक्चर आयकॉन असतो त्यावर एकदा क्लिक करून घ्या. थोडस चेक करा तेथे सेटिंग्जचा पर्याय तुम्हाला दिसेल. आता त्याच्यावर टॅप करा. Privacy and Security चा पर्याय तुमच्या समोर आलेला असेल. त्यावर आता जर तुम्ही क्लिक केलं तर ‘डेटा आणि पर्सनलायझेशन’ हा ऑप्शन तुमच्या समोर येऊन चमकेल. यावर देखील क्लिक करावे लागेल व पुढे जावे लागेल.
आता तुमच्यासमोर Google अकाउंट असं दिसेल त्यावर क्लिक करा एक नवीन विंडो ओपन झालेली असेल. येथे तुम्हाला Payment Transactions and Activities चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून स्क्रोल करा तुम्हाला ‘डिलीट’ पर्याय दिसेल.
काय आहेत ऑप्शन?
वर सांगितलेल्या प्रोसेसने तुम्ही गेलात की, ट्रॅन्जेक्शन डिलीट करू शकता. येथे तुम्हाला तुम्हाला हव्या त्या वेळेचा ट्रॅन्जेक्शन डिलीट करता येईल. यासाठी तुम्हाला हवा तो टाइम, डेट निवड करा व डिलीट करा. अशा पद्धतीने तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता, हवे तेव्हा हवे ते ट्रॅन्जेक्शन डिलीट करू शकता.